पहा ‘लग्नाची बेडी’ मालिकेतील कलाकारांची पहिली मालिका कोणती होती..??

लग्नाची बेडी ही मालिका सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेमध्ये अनेक कलाकार आहे काम करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये सिंधू आणि राघव यांची प्रेम कहाणी असली तरी या मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये मधु हिची भूमिका देखील चांगली झाली आहे.
राखी हीची भूमिका देखील चांगली झाली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला संकेत पाठक हा अभिनेता राघवच्या भूमिकेत दिसला आहे, तर सिंधूच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री सायली देवधर दिसली आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी सगळ्यात आधी कुठली मालिका केली होती, याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..
राघव – कलर्स मराठी वरील जय हो महाराष्ट्र पोलीस ही राघव अर्थात संकेत पाठक याची पहिली मालिका होती. या मालिकेत देखील संकेत हा पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता.
सिंधू – लग्नाची बेडी या मालिकेमध्ये सिंधूच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री सायली देवधर हिने सगळ्यात आधी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेत काम केले होते. तिची ही पहिली मालिका होती. या मालिकेत तिने जबरदस्त काम केले होते. या मालिकेत तिने चित्रा ही भूमिका साकारली होती. ती प्रेक्षकांना खूपच आवडली होती.
वृषभ – अभिनेता गंगाधर खरपुडीकर याने अनेक चित्रपटात काम केले आहे. गंगाधर याची पहिली मालिका प्रेमा तुझा रंग कसा ही होती. स्टार प्रवाह या वाहिनीवर ही मालिका होती. त्याने या मालिकेत चांगले काम केले होते.
मधु – अभिनेत्री रेवती लेले हिने लग्नाची बेडी मालिकेत चांगले काम केले आहे. रेवती हिची सगळ्यात आधीची मालिका ही रात्रीस खेळ चाले होती. तसेच रेवती लेणे हिने स्वामिनी या मालिकेतही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला होता सध्या ती आदीश वैद्य याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
राखी – लग्नाची बेडी या मालिकेमध्ये राखीची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते. ही भूमिका अभिनेत्री माधुरी भारती हिने साकारली आहे. राखीची भूमिका माधुरी हिने अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे.