लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदी पडली प्रेमात? पाहा कोण आहे तो मुलगा

सध्या चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिज्ञा भावे, शर्मिष्ठा राऊत यांच्या पाठोपाठ आता अभिनेता अस्ताद काळे देखील लग्न बंधनात अडकणार आहे.
दरम्यान दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी देखील प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी ही सतत चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
नुकताच स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या चर्चेत असून स्वानंदी प्रेमात आहे की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या तरुणाचे नाव प्रेम मोदी आहे. या फोटोमध्ये ते दोघे एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत.
दोघेही फोटोमध्ये अतिशय आनंदी आहेत. हा फोटो शेअर करत स्वानंदीने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.’तुझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण एकमेकांना साथ दिली आणि अधिक जवळ आलो.
आता मला तुझी इतकी सवय झाली आहे की एकटं रहायला भीती वाटते. खूप प्रेम…’ या आशयाचे कॅप्शन तिने फोटो शेअर करत दिले आहे. हे कॅप्शन वाचून आनंदी प्रेमात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.