खुपचं सुंदर आहे ‘मलिंगा’ ची बायको, पहा फोटो

खुपचं सुंदर आहे ‘मलिंगा’ ची बायको, पहा फोटो

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा हा त्याची आगळीवेगळी गोलंदाजी साठी प्रसिद्ध आहे. 28 ऑगस्ट 1983 रोजी गॅले येथे जन्मलेल्या या क्रिकेटपटूचे वैयक्तिक आयुष्य अतीच मनोरंजक आहे. मलिंगाच्या पत्नीबद्दल बोलू, तर तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता जी पूर्वी डान्सर आणि चीअरलीडर होती.

मलिंगाची पत्नी तान्या परेराचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. मात्र, नंतर त्यांचे कुटुंब श्रीलंकेत स्थलांतरित झाले. तान्याला कॉलेज जीवनापासूनच नृत्याची आवड होती. प्रथम तान्या एक व्यावसायिक नृत्यांगना झाली, त्यानंतर तिने ऑस्ट्रेलियात चीअरलीडर म्हणूनही काम केले. यानंतर ती एका कंपनीत मॅनेजर झाली.

जेव्हा मलिंगा पहिल्याच नजरेत प्रेम करून बसला

मैदानावर आपल्या तुफानी गोलंदाजीने बड्या दिग्गजांना धूळ चाटणारा हा गोलंदाज तान्या मिनोली परेराच्या हसण्यावर ‘बोल्ड’ झाला होता. हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा मलिंगा एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी आला होता. त्या कार्यक्रमाची व्यवस्थापक तानिया होती. या भेटीचा प्रवास लग्नापर्यंत पोहोचला.

मलिंगाची पत्नी तान्याने एका मुलाखतीत त्यांच्या प्रेमकहाणीचा खुलासा केला. ती म्हणाली, “लसिथ मलिंगा आणि माझी पहिली भेट हिक्काडुवा येथील हॉटेलमध्ये झाली होती. मलिंगा एका जाहिरातीच्या निमित्ताने तिथे आला होता. त्यावेळी मी तिथे इव्हेंट मॅनेजर होते. तो म्हणाला, “माझ्यासाठी ही एक छोटीशी भेट होती, पण तो मला पहिल्या नजरेतच आवडला.

Team Hou De Viral