लसूण नाही तर लसणाची सालही आहे अत्यंत उपयुक्त…

लसूण नाही तर लसणाची सालही आहे अत्यंत उपयुक्त…

लसूण खाण्याचे फायदे आपण जाणतो. त्याचा स्वयंपाकात आर्वजून वापरही करतो. पण लसणाची सालही अत्यंत फायदेशीर आहे, हे अनेकांना ठाऊक नसेल. त्यामुळे त्या सहज फेकल्या जातात. पण त्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर लसणाच्या साली फेकण्याची चूक तुम्ही करणार नाही. तर मग जाणून घेऊया काय आहेत लसणाच्या सालीचे फायदे…

1) पाण्यात लसणाच्या साली उकळवून घ्या. त्यानंतर पाणी गाळून त्या पाण्याने केस धुवा. केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

2) पिंपल्स अनेक मुलींचे शत्रू आहेत. तुम्हीही पिंपल्सने हैराण असाल तर लसणाच्या सालीची पेस्ट बनवा आणि पिंपल्सवर लावा. पिंपल्सची समस्या दूर होईल.

3) पायांना सूज आल्यास लसणाच्या साली पाण्यात उकळवा आणि ते थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात पाय घालून बसा. पायांची सूज उतरण्यास मदत होईल.

4) पाण्यात लसणाच्या साली उकळवा. त्यानंतर गाळून ते पाणी प्या. त्यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल.

5) लसणाच्या साली अस्थमा पेशंटसाठी फायदेशीर ठरतील. यासाठी लसणाच्या साली वाटून त्यात मध मिसळा आणि खा. अस्थमावर आराम मिळेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral