दररोज कच्च्या लसणाची एक पाकळी खा… आणि पळवा ‘या’ आजारांना दूर..

भारतीय पाकशास्त्र जगभरामध्ये सर्वाधिक चांगले असल्याचे म्हटले जाते. याचे कारणही तसेच आहे. भारतीय व्यंजनामध्ये गोड मिष्ठान्न रुचकर तिखट-मीठ याचा सर्वत्र वापर केला जातो. भारतीय मसाले याची प्रचिती तर दूर देशात देखील आहे. मसाल्यांच्या सेवनामुळे भारतामध्ये अनेक रोगांवर देखील उपचार होत असल्याचे आपण पाहिले असेल. तसेच मसाल्याचे नियमित सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील चांगली राहते. तसेच जेवण बनवण्यासाठी लागणारे वरण, भाजी यासाठी कांदा, लसुन याचा मोठ्या प्रमाणात भारतात वापर होतो.
रोजच्या जेवणामध्ये लसणाची फोडणी झाल्याशिवाय जेवण बनतच नाही. वरण किंवा भाजी करण्यासाठी लसुन हा वापरण्यात येतो. लसणामुळे जेवणाची चव तर वाढते. मात्र, याच्या औषधी गुणधर्मामुळे शरीर देखील योग्य हालचाल करत असते. लसूण कच्चा खाल्ल्याने अनेक फायदे होत असतात. या सणांमध्ये ऍलिसइन अँटिबायोटिक तत्व असतात. त्यामुळे लसणाचे सेवन नियमित प्रमाणे केले पाहिजे. या लेखांमध्ये लसुन खाल्ल्याने होणारे फायदे सांगणार आहोत. उपाशीपोटी कच्चा लसूण खाऊन पाणी प्यावे. यामुळे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. तर मग जाणून घेऊया लसुन खाल्ल्याने होणारे फायदे…
1) लसणाच्या पाकळ्या उपाशीपोटी खाव्यात.असे केल्याने ज्यांना उच्चरक्तदाबाची समस्या आहे. त्यांना उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. मात्र, असे नियमितप्रमाणे करावे. त्याचा फायदा होतो.
2) लसूण खाल्ल्यानं आपल्या रक्तवाहिन्यात मध्ये रक्ताच्या गाठी बनत नाहीत. त्यामुळे हृदयविकाराचा धक्का येण्याची शक्यता अतिशय कमी असते. लसूण आणि मध एकत्र खाल्ल्यानं हृदयाच्या धमन्यांमध्ये असलेले ब्लॉकेज दूर होतात.
3) लसणाच्या सेवनानं शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत राहते. तसेच यकृत आणि मूत्राशयाचे कार्य सुरळीत चालू राहण्यास मदत होते. मात्र याचा वापर दैनंदिन जीवनामध्ये दररोजचा दररोज करायला पाहिजे. तर त्याचा उपयोग होऊ शकतो.
4) लसणाच्या सेवनामुळे पचनसंस्था चांगली राहते. ज्या लोकांना अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत असेल त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये दररोज लसणाची एक पाकळी खाल्ल्यास या मुळे पचनक्रिया ही चांगली सुधारण्यास मदत मिळते.
5) लसुन खाण्याचे अनेक फायदे असतात. त्याचबरोबर ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्यास आम्लपित्ताचा त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मोठी मदत होते.
6) अनेकदा सर्दी, खोकला त्यामुळे लहान मुलांपासून मोठे व्यक्तीसुद्धा त्रस्त असतात. औषध गोळ्या घेऊन देखील खोकला कमी होत नाही. ज्या लोकांचा खोकला किंवा सर्दी कमी होत नसेल. त्यांनी लसुन पाकळी खावे. यामुळे सर्दी, खोकला कमी होण्यास नक्कीच मदत होते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.