सुंदरा मनामध्ये भरलीमधील लतिका आहे प्रसिद्ध निर्मात्याची मुलगी, तिची बहीण देखील आहे अभिनेत्री

सुंदरा मनामध्ये भरलीमधील लतिका आहे प्रसिद्ध निर्मात्याची मुलगी, तिची बहीण देखील आहे अभिनेत्री

सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली लतिका तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. याच लतिकाच्या बाबतीत एक खास गोष्ट आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाच्या भूमिकेत असलेली अक्षया नाईक प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. अक्षयाने या मालिकेच्याआधी ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत देखील काम केले होते. तसेच फिट इंडिया या चित्रपटात देखील ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

सुंदरा मनामध्ये भरली ही तिची पहिली मालिका असून या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.अक्षया ही निर्माते अरविंद नाईक यांची मुलगी आहे तर त्यांची दुसरी मुलगी देखील अभिनेत्री आहे. अक्षयाची बहीण अक्षताने लहानपणी अशी ज्ञानेश्वरी या मालिकेत काम केले होते.

या मालिकेत रमेश भाटकर, नंदू माधव आणि सयाजी शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट त्याकाळात चांगलाच गाजला होता. तसेच या चित्रपटातील ही चिमुकली सगळ्यांना भावली होती.अक्षताने लहानपणी चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ती आता अभिनयक्षेत्रापासून दूर आहे.

पण तिची बहीण अक्षया अभिनयक्षेत्रात चांगलेच नाव कमावत आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील तिच्या अभिनयाचे सध्या चांगलेच कौतुक होत आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral