दररोज फक्त 2 ते 3 ‘लवंग’ चघळा आणि या मोठ्या आजारांपासून दूर रहा

भारतीय संस्कृतीमध्ये असे अनेक पदार्थ आहेत की ज्याचा उपयोग दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. भारतीय मसाले हे वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यामुळे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती ही खूप जास्त असते. सध्या कोरोना काळ असला तरी इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतातील मृत्यू दराची संख्या अतिशय कमी आहे.
तसेच भारताची रुग्ण संख्या देखील आटोक्यात आलेली आहे. भारताचा रिकव्हरी हा जवळपास 80 टक्के च्या वर पोहोचला आहे. याचे कारण म्हणजे भारतीयांची आहार-विहार पद्धती आहे. भारतीय लोक हे अतिशय मसालेदार आणि तिखट पदार्थ खातात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती ही अतिशय वाढते. भारतातील मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लवंग या पदार्थाविषयी आपल्याला आम्ही माहिती देणार आहोत.
लवंगचा उपयोग आपण मसाल्यात देखील करतो. तसेच दैनंदिन खाण्यात देखील वापरता येते. जेवण झाल्यानंतर लवंग खाल्ल्यानंतर आपल्याला त्याचे अनेक फायदे होतात. लवंग मध्ये अक्सिडेंट आणि आणि बॅक्टरियल तत्व असतात. त्यामुळे लवंग हे अनेक आजारांवर गुणकारी आहे. आम्ही या लेखांमध्ये आपल्याला लवंगचे फायदे सांगणार आहोत.
१. मासिक पाळी : अनेक महिलांना मासिक पाळीचा त्रास असतो. दैनंदिन जीवनात लवंग एक तुकडा रोज खाल्ल्यास पाळीचा त्रास महिलांना होत नाही. पाळी वेळच्या वेळी येते.
२. सर्दी खोकला: आपल्याकडे अनेक जणांना सर्दी खोकल्याचा त्रास असतो. अनेकदा औषधी गोळ्या घेऊन देखील हा त्रास कमी होत नाही. मात्र, आपण दैनंदिन जीवनात लवंग खाल्ल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. लवंगेचा एक तुकडा खाल्ल्यास सर्दी किंवा खोकला कमी होऊ शकतो.
३.चेहऱ्यावरील पुरळ: तारुण्यात अनेक तरुण-तरुणींना मुरूम, पुरळ समस्या जाणवते. जर तुम्ही लवंग आपल्या खाण्यात वापरली तर हा त्रास कमी होऊ शकतो.
४. पचनक्रिया सुधारते : अनेकांना पचनक्रियेचे त्रास असतात. अनेक जण बाहेरचे खातात. त्यामुळे त्यांची पचन क्रिया ही बिघडते. मात्र, जेवणानंतर लवंग खाल्ल्यास ही क्रिया चांगली सुधारते.
५. दात दुखी: काही जणांना अचानक दात दुखीचा त्रास सुरू होऊ शकतो. मेडिकलमधील गोळ्या खाण्यापेक्षा आपण जो दात दुखतोय त्याचा खाली लवंग ठेवल्यास ताबडतोब आराम पडू शकतो.
६.तोंडाची दुर्गंधी : अनेकदा आपण समोरच्या व्यक्तीला बोलत असताना तोंडाचा वास एकदम येतो. त्यामुळे असा वास येत असल्यास लवंग खावी. त्यामुळे तुमच्या तोंडाची दुर्गंधी ही नाहीशी होते.
७. सांधेदुखी : आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे आपण दैनंदिन जीवनामध्ये लवंग चा वापर केल्यास आपली सांधेदुखी ही काही प्रमाणात कमी होऊ शकते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.