सकाळी सकाळी फक्त एक कप लवंगाचा चहा घ्या, मिळतील हे जबरदस्त फायदे !

लवंगचा चहा हा असा एक चहा आहे जो केवळ शौकसाठी घेतला जात नाही तर त्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक प्रकारे फायदा मिळतात. विशेषतः हिवाळ्यात हा चहा खूप प्रभावी काम करतो. चला तर मित्रांनो लवंग चहाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया….
1) त्वचेच्या समस्येमध्ये फायदेशीर – आपण यापूर्वी कधीही याबद्दल ऐकले नसेल परंतु ते सत्य आहे. लवंग चहा प्यायल्याने शरीरात असलेले विष बाहेर पडते. मुरुमांमुळे आणि चेहर्यावर होणाऱ्या इतर समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो. कोणत्याही इन्फेक्शनने त्वचेची कोणतीही समस्या असल्यास लवंग चहा त्यास आराम देईल.
2) थंडी, सर्दीपासून मुक्तता – या बदलत्या हंगामात, जरी आपल्याला सर्दी चा त्रास होत असेल तर लवंग चहा आपल्यासाठी औषध म्हणून काम करू शकतो. कारण लवंगचा प्रभाव हा गरम असतो आणि त्याचा चहा पिण्यामुळे सर्दी ही कमी होण्यास मदत होते. जर आपल्याला सर्दी झालेली असेल तर लवंग चहा प्यायल्याने आराम मिळू शकेल.
3) तापेला पळवून लावतो – जर तुम्हाला ताप सुरू झाला असेल तर लगेच लवंग चहा बनवून तो प्या. लवंगामध्ये असणारी औषधी घटक ताप करण्याचे काम करतात. लवंग चहा नैसर्गिक मार्गाने ताप कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
4) अंगदुखी पासून आराम – हिवाळा सुरू होताच काही लोकांना गुडघाचे दुखणे या समस्येचा सामना करावा लागतो. विशेषत: वृद्धांना उठण्यात बसण्यात खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत लवंग चहा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. लवंग चहाने स्नायू दुखणे देखील बरे होते. आपण लवंगाच्या पाण्याने देखील शेक घेऊ शकता.
5) दातांसाठी फायदेशीर – लवंगाचा कोमट चहा दातांसाठी खूप आरामदायक आहे. यासाठी बर्याच वेळा लोकांना पेन किलरचा सहारा घ्यावा लागतो. पण लवंग चहा असे औषध आहे जे तत्काळ दातदुखी कमी करते. एकवेळ पेन किलर वगळून लवंग चहाचा तुम्ही प्रयत्न करू शकता.
6) पोटाच्या समस्येमध्ये फायदेशीर – जर एखाद्यास आम्लता, पोटदुखी आणि जळजळ असेल तर आपण लवंग चहा घेऊ शकता. लवंग चहा पचन सुधारतो आणि पोटदुखी बरा करतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.