मराठी कलाविश्व हादरलं ! प्रसिद्ध कलाकाराचे दुःखद निधन

मराठी कलाविश्व हादरलं ! प्रसिद्ध कलाकाराचे दुःखद निधन

आपल्या वेगळ्या अशा कलेने सगळ्यांचेच मन जिंकून घेणाऱ्या लावणी कलावंत अनेक आहेत. आता एका ज्येष्ठ लावणी कलावंतीनेचे निधन झाले आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला या लेखामध्ये माहिती देणार आहोत. लावणी म्हटले की, आपल्यासमोर अनेक नृत्यांगना या येतातच.

मात्र काही नृत्यांगना या अशा असतात की, ज्यांना विसरता येणे शक्य होत नाही. यामध्येच सुरेखा पुणेकर यांचे नाव देखील आपल्याला घेता येईल, तर अलीकडच्या काळामध्ये माधुरी पवार यासारख्या तरुणीने लावणी क्षेत्रात चांगले नाव कमावले आहे. त्याचबरोबर अमृता खानविलकर हिनेदेखील अनेक चित्रपटात लावणी साकारली आहे.

नटरंग चित्रपटात तिने साकारलेली लावणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. त्याचप्रमाणे तिचा अलीकडच्या काळात चंद्रमुखी हा चित्रपट आला होता. चंद्रमुखी चित्रपटातही तिने चंद्रा या गाण्यावर तुफान अशी लावणी सादर केली. ही लावणी देखील अतिशय लोकप्रिय ठरली होती.

मात्र, खऱ्या अर्थाने लावणीला ओळख मिळवून दिली ती सुरेखा पुणेकर, गुलाब बाई संगमनेरकर यांच्यासारख्या कलावंतांनी. आता या ज्येष्ठ कलावंतनीचे निधन झाले आहे. आम्ही याबद्दलच आपल्याला माहिती सांगणार आहोत. लावणीसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या आणि अदाकारीचे वेगळे वैशिष्ट्य असलेल्या जेष्ठ लावणी कलावंत गुलाबवाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले.

त्यांनी आपल्या घरी आखरीचा श्वास घेतला. त्यांचे पुण्यात निधन झाले. अगदी बाल वयातच त्यांनी लावणी आणि आपल्या प्रत्येक कलेला सुरुवात केली होती. पाच दशकावून अधिक काळ त्यांनी रसिकाच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्यांनी गायलेल्या लावण्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. राज्य सरकार देत असलेला विठाबाई नारायणगावकर जीवन गुरव गौरव पुरस्कार त्यांना याआधी मिळत होता.

त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. लावणी क्षेत्रात आता एक पोकळी निर्माण झाल्याचे देखील अनेकांनी म्हटले आहे. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी अलका, कल्पना आणि वर्षा या तीन मुली आहेत. नगर जिल्ह्यातील संगमनेर हे त्यांचे मूळ गाव होते. मात्र, गेल्या तीन दशकाहून अधिक काळ त्यांच पुण्यामध्ये वास्तव्य होते.

अधिक काळ त्या पुण्यामध्येच राहायच्या. दयाराम मोरे आणि शिवडाबाई उर्फ शांताबाई या दांपत्याच्या घरी 1932 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्यांनी लावणीला एक वेगळे आयाम दिल्याचे पाहायला मिळाले.

Team Hou De Viral