‘शेवटच्या क्षणी लोणावळ्यात…’,सर्वांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्याच्या अखेरच्या दिवसाची हृदयस्पर्शी कहाणी

‘शेवटच्या क्षणी लोणावळ्यात…’,सर्वांना खळखळून हसवणाऱ्या लक्ष्याच्या अखेरच्या दिवसाची हृदयस्पर्शी कहाणी

मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला पडलेले गोड स्वप्न म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde ) यांना जाऊन तब्बल 18 वर्षे उलटली तरी त्यांच्यातील अभिनय आजही लोकांमध्ये अजरामर आहे. याच महान अभिनेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक वाहिन्या या वेगवेगळे कार्यक्रम देखील घेत असतात. तसेच त्यांच्यावरील चित्रपट देखील दाखवत असतात.

नुकतीच अशोक सराफ सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar ) यांनी देखील लक्ष्मीकांत यांची आवर्जून आठवण या निमित्ताने काढली होती. लक्ष्मीकांत यांचे आवडते दिग्दर्शक महेश कोठारे ( Mahesh Kothare ) देखील त्याच्या आठवणींनी गहिवरून गेले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आजवर अनेक जबरदस्त चित्रपट केले आहेत. यात ‘एकापेक्षा एक’ ‘चिकट नवरा’ ‘रंग प्रेमाचा’, ‘लपवा छपवी’ ‘इजा, बिजा, तिजा’ आणि ‘बजरंगाची कमाल’ या सिनेमांचा समावेश आहे.

गेली दोन दशकं प्रेक्षकांचं लक्ष्यावरचे प्रेम कमी झाले नाही. ‘धूमधडाका’ या चित्रपटातून मराठी चित्रपट विश्वात पाऊल ठेवलेल्या लक्ष्याने मराठी सिनेसृष्टी गाजवली. याचा प्रभाव एवढा होता की, लक्ष्याच्या हिंदी पदार्पणावेळी ‘लक्ष्या आला रे…!’ धूम धडाका लावण्यात आला होता. मराठी हिंदी विनोदी कलाकारांना पुरून उरलेल्या अशा लक्ष्याचे चित्रपट आहेत.

अशी ही बनवाबनवी हा चित्रपट सर्वांनाच आठवतो. यासोबतच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अशोक सराफ यांची जोडी अतिशय अफलातून अशी होती. तसेच त्यांनी सचिन आणि महेश कोठारे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांचे मराठीतील बहुतांशी चित्रपट हे हिट झाले आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अनेक चित्रपटात काम केलेले आहे. हिंदीमध्ये त्यांनी मैने प्यार किया सारख्या चित्रपटात काम करून सर्वांचीच मन जिंकली होती, तर इतर काही हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांना मूत्र पिंडाचा आजार झाला होता. त्यामुळे शेवटच्या दिवसांमध्ये ते अतिशय एकाकी पडले होते.

शेवटच्या दिवसांमध्ये ते लोणावळा येथील आपल्या बंगल्यामध्ये राहत होते आणि ते कोणाला भेटत देखील नव्हते, अशी माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर त्यांनी 2004 मध्ये अखेरचा श्वास घेतला. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलंही आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चांगलीच रुळली आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी महेश कोठारे यांच्या प्रेमापोटी पछाडलेला हा सगळ्यात शेवटचा चित्रपट केला होता. त्यानंतर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आजही लक्ष्मीकांत बेर्डे हे सर्वांच्या स्मरणात आहेत.

Team Hou De Viral