वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? हे आरोग्यवर्धक पेय प्यायला सुरुवात करा, 100% फायदा होणार

वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय? हे आरोग्यवर्धक पेय प्यायला सुरुवात करा, 100% फायदा होणार

एकाच ठिकाणी बसून काम करणे, शारीरिक हालचाली नसणे, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी यामुळे काही जण वजन वाढीच्या समस्येचा सामना करतात. वजन वाढल्याने अन्य गंभीर आजारांनाही आयते निमंत्रण मिळते. भविष्यामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या टाळण्यासाठी वजन नियंत्रणात असणे आवश्यक आहे. घरी बसल्या वजन कमी कसे करायचे? खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण कसे ठेवायचे? यावर तुम्ही उपाय शोधत आहात का.

यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. जिम, योगासने, व्यायाम, डाएट फॉलो न करता वजन कमी करू शकता. अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी आम्ही तुम्हाला एक आयुर्वेदिक पेयाची (Ayurvedic Remedies) माहिती देणार आहोत. यातील औषधी घटकांमुळे वजन कमी होईलच शिवाय अन्य आरोग्यदायी लाभ देखील मिळतील.

आयुर्वेदिक पेयाचे वैशिष्ट्य

आयुर्वेदिक पेय तयार करण्यासाठी तुम्हाला केवळ गूळ आणि लिंबू (Jaggery And Lemon) या दोन सामग्री आवश्यक आहेत. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये गूळ आणि लिंबू असतेच. या पेयामुळे तुमच्या शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो. जेवणानंतर गुळाचे सेवन केल्यास शरीराची चयापचयाची क्षमता वाढते. चयापचयाची प्रक्रिया योग्य पद्धतीनं पार पडल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वाढलेले पोट कमी होण्यास मदत मिळेल.

आरोग्यवर्धक लिंबू

गुळासह लिंबूचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्याला कित्येक फायदे मिळतील. लिंबू पाणी किंवा लिंबूचा रस आपल्या चेहऱ्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे. यातील औषधी घटकांमुळे आपल्या त्वचेवर चमत्कारी बदल पाहायला मिळतात. लिंबूमुळे आपलं शरीर डिटॉक्स होतं. शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. महत्त्वाचे म्हणजे यामुळे वजन घटण्यास मदत मिळते.

गूळ आणि लिंबूचे फायदे

गूळ आणि लिंबू एकत्रित करून त्याचे सेवन केल्यास शरीराला औषधी गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होता. याद्वारे तुम्हाला व्हिटॅमिन सी (Vitamin C) आणि पाणी ही दोन्ही पोषण तत्त्वे मिळतील. या पेयामध्ये झिंक आणि अँटी ऑक्सिडेंट्स (Anti-oxidants) चाही साठा आहे. साखरेऐवजी गुळाचे सेवन करणं आरोग्यासाठी लाभदायक असते, असा सल्ला आपल्याला आजी – आईने अनेकदा दिला असेलच. गुळामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. गूळ आणि लिंबू पाणी प्यायल्यास पचन प्रक्रिया आणि श्वसन प्रणालीशी संबंधित समस्या दूर होतात.

कसे तयार करायचे पेय?

एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबू रस मिक्स करा. यानंतर गूळ पावडर किंवा गुळाचा छोटा तुकडा त्यात टाका. पाण्यामध्ये गूळ विरघळेपर्यंत सर्व सामग्री नीट मिक्स करून घ्या. तयार झालंय आपले वेट लॉस ड्रिंक. सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्यायल्यानंतर तुम्हाला अधिक लाभ मिळतील. उन्हाळ्यामध्ये या पेयामध्ये तुम्ही पुदिना मिक्स करू शकता. जेणेकरून शरीरातील उष्णता देखील कमी होईल.

रक्त शुद्ध होते

गुळामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट्स असतात. याव्यतिरिक्त यात लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी या घटकांचेही प्रमाण भरपूर आहे. गुळाच्या सेवनामुळे रक्त शुद्ध होते. चयापचयाची क्षमता सुधारते. यामुळेच वजन कमी करण्यासाठी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण गुळामध्ये कॅलरी देखील कमी असतात.

Team Hou De Viral