‘चला हवा येऊ द्या’ फेम ‘अंकुर वाढवे’ च्या पत्नी ला पाहिलंत का ?

सध्या छोट्यावर चला हवा येऊ द्या अतिशय जोरदारपणे सुरू आहे. या शोचे सूत्रसंचालन डॉक्टर निलेश साबळे हे आहेत. या शोमध्ये अनेक कलाकार हे सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सागर कारंडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, भरत गणेशपुरे श्रेया बुगडे यासारखी भली मोठी फौज या शोच्या मदतीला धावून आलेली आहे.
हा शो अतिशय लोकप्रिय असून डॉक्टर निलेश साबळे हे नेहमी आपल्या बहारदार सूत्रसंचालनाने या शोची शोभा वाढवत असतात. अनेकदा ते राज ठाकरे यांची मिमिक्री देखील करत असतात. त्यांच्या मिमिक्रीला खुद्द राज ठाकरे यांनी देखील दाद दिली आहे. आता या शोला महाराष्ट्रातून मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.
गणेशोत्सवाच्या काळामध्ये हा शो मोठ्या प्रमाणावर दाखवल्या जातो. त्याचप्रमाणे या शोला आणि यातील कलाकारांना देखील गणेशोत्सवा दरम्यान मोठी मागणी असते. कलाकार देखील अनेकांना नाराज न करता तिथे जाऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात. अर्थातच यासाठी ते तगडे मानधन देखील घेत असतात तर आता देखील या शोमधील दोन कलाकारांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. स्नेहल छिंदम आणि अंकुर वाढवे यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून हे दोघेही चला हवा येऊ द्याच्या सेटवर प्रॅक्टिस करत करत आहेत. अंकुर वाढवे आणि स्नेहल यांच्या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहे. ही जोडी सध्या प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन करताना दिसत असते.
अंकुर वाढवे याने करिअरच्या सुरुवातीला खूप स्ट्रगल केल्याची माहिती समोर आली आहे. अतिशय खडतर परिस्थिती मधून त्याने आपल्या करिअरला नवीन आयाम दिला. आज तो मराठी चित्रपट सृष्टीमधील आघाडीचा विनोद वीर म्हणून गणला जातो. आपल्या अफलातून टाइमिंगने तो सगळ्यांचेच मनोरंजन करताना दिसत असतो.
अतिशय जबरदस्त असलेला हा ऍक्टर सर्वांनाच हवाहवासा वाटतो. चला हवा येऊ द्या या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झालेले आहेत. डॉक्टर निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, सागर करंडे, कुशल बद्रिके यांच्यासह तो अतिशय जबरदस्त रित्या परफॉर्मन्स करताना दिसत असतो. आता अंकुर वाढवे याच्या बाबतीतली एक बातमी नुकतीच सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेली आहे.
या बातमीनुसार अंकुर वाढवे हा विवाहित असून त्याच्या पत्नीचे नाव निकिता वाढवे, असे आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला एक मुलगी देखील आहे. आपल्या कुटुंबाप्रती तो खूपच संवेदनशील असल्याचे सांगण्यात येते. तसेच सोशल मीडियावर तो अनेकदा आपल्या कुटुंबाविषयी माहिती देखील देत असतो, तर आपला अंकुर वाढवे याचा अभिनय आवडतो का आम्हाला नक्की सांगा.