केदार शिंदे यांच्या मुलीला पाहिलंत का ? झळकणार या चित्रपटात

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये केदार शिंदे यांच्या नावाचा बोलबाला हा खूप मोठा आहे. केदार शिंदे यांनी अनेक मालिका चित्रपटात काम करून आपल्या दिग्दर्शनाची जादू ही दाखवून दिली आहे. केदार शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी सही रे सही हे नाटक केले होते.
या नाटकामध्ये त्यांनी अतिशय जबरदस्त रित्या आपले दिग्दर्शन दाखवून दिले होते. केदार शिंदे यांच्या नाटकामध्ये आपल्याला भरत जाधव यांच्यासह अनेक कलाकार दिसले होते. हे नाटक मराठी रंगभूमीवरील एक आजरावर नाटक असल्याचे बोलले जाते. त्यानंतर भरत जाधव याला या नाटकामधून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली असे म्हणावे लागेल.
भरत जाधव हा अजूनही अधून मधून या नाटकाचे प्रयोग करत असतो. केदार शिंदे याने त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटाची निर्मिती देखील केली. केदार शिंदे यांनी काही वर्षांपूर्वी श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका केली होती. त्यांची ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदनी या कादंबरीवर आधारित होती.
या मालिकेमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी देखील भूमिका केली होती. त्यांची आभाळ ही भूमिका प्रचंड चालली होती. या मालिकेमध्ये आपल्याला राजन भिसे यांच्यासह शुभांगी गोखले आणि इतर कलाकार देखील दिसले होते. ही मालिका मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय मालिका ठरली होती.
त्यानंतर केदार शिंदे यांनी काही चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती देखील केली. मात्र, गेल्या काही वर्षात केदार शिंदे हे काहीसे चित्रपटसृष्टीतून थोडे बाजूला गेल्याचे दिसत आहे. मात्र, आता देखील ते पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण की केदार शिंदे यांचा लवकरच एक नवीन चित्रपट येणार आहे.
महाराष्ट्राचा शाहीर हा चित्रपट केदार शिंदे हे तयार करत आहेत. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी याने शाहीर साबळे यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटाचे आकर्षण म्हणजे केदार शिंदे यांची मुलगी सना ही देखील मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.
एकूणच काय तर केदार शिंदे यांची मुलगी आता चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करणार असल्याचे आपण यानिमित्ताने पाहणार आहोत, तर केदार शिंदे यांची कुठली मालिका चित्रपट किंवा नाटक आपल्याला सर्वाधिक आवडते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.