महेश मांजरेकरांचे झालेत 2 लग्न, बघा पहिली घटस्पोटीत बायको

महेश मांजरेकर हे असे एक नाव आहे की, ज्यांनी बॉलीवूड चित्रपटासह मराठीत देखील तेवढ्याच खुबीने काम केले आहे. तसेच त्यांनी तेलगू, तामिळ चित्रपटात देखील काम केले आहे. महेश मांजरेकर अभिनेता, दिग्दर्शक, कथा लेखक अशा सर्व भूमिका वठवताना दिसतात.
महेश मांजरेकर यांच्या नावावर अनेक हिट चित्रपट आहेत. महेश मांजरेकर यांनी 1995 मध्ये आई हा चित्रपट केला होता. या चित्रपटात त्यांनी देखील काम केले. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात त्यांनी मेधा मांजरेकर यांना ब्रेक दिला होता. त्यावेळेस मेधा मांजरेकर यांच्या सौंदर्यावर महेश मांजरेकर हे भाळले होते.
त्यामुळे या चित्रपटात मेधानेच काम करावे, असे महेश मांजरेकर यांना वाटत होते. मात्र त्या चित्रपटासाठी तयार नव्हत्या. मात्र, त्यांनी खूप विनंती केल्यानंतर मेधा यांनी परदेश दौरा झाल्यानंतर या चित्रपटात काम करण्याचे ठरवले. त्यानंतर हा चित्रपट तयार झाला आणि तो हीट देखील झाला. त्यानंतर या दोघांचे प्रेमप्रकरण चांगलच खुलल होते.
मात्र, महेश मांजरेकर हे आधीपासूनच विवाहित असल्याने अडचण होती. मेधा यांच्यापासून महेश मांजरेकर यांना सई, अश्वमी आणि सत्या मुले आहेत. यापैकी सईने सलमान खानचा दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा चित्रपट देखील बर्यापैकी गाजला होता. सलमान याने केवळ आपल्या मैत्रीखातर महेश मांजरेकरच्या मुलीला चित्रपटात संधी दिली.
तर सत्या मांजरेकर हा देखील चित्रपटात येण्यासाठी धडपडत आहे. महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये वास्तव हा चित्रपट दिला होता. या चित्रपटाला पहिल्यांदा संजय दत्त याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. त्यानंतर कुरुक्षेत्र हा चित्रपट देखील महेश मांजरेकर सोबत संजय दत्त याने केला होता.
त्यानंतर महेश मांजरेकर यांनी मराठीत आपला मोर्चा वळवला. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा चित्रपट त्यांनी केला. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांनी मराठीमध्ये अनेक असे चित्रपट बनवले. यापैकी काकस्पर्श हा त्यांचा चित्रपट प्रचंड चालला होता. आताही ते एका चित्रपटाच्या निर्मितीवर काम करत आहेत.
आज आम्ही आपल्याला महेश मांजरेकर यांच्या तिसऱ्या लेकीबद्दल माहिती देणार आहोत. महेश मांजरेकरचा तिसऱ्या लेकीचे नाव गौरी इंगवले असे आहे. ती देखील अभिनेत्री आहे. गौरी इंगवले ही मेधा यांच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. गौरी देखील अभिनेत्री आहे. तिने याआधी कुटुंब या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या भूमिका होत्या.
त्याचबरोबर तिने ओवी या नाटकात देखील काम केले होते. आता महेश मांजरेकर यांच्या पांघरून या चित्रपटात ती पदार्पण करणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांनी पहिले लग्न दीपा मेहता या कॉस्ट्यूम डिझायनर सोबत केले होते. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी दीपा यांना घटस्फोट दिला आणि मेधा यांच्या सोबत लग्न केले.
दीपा आणि महेश यांचे नाते हे खूप चांगले होते. मात्र त्यांच्या नात्यांमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाले. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी पत्नी पासून काही काळ वेगळा राहण्याचा निर्णय घेतला आणि याच दरम्यान महेश मांजरेकर यांची मेधा मांजरेकर यांच्यासोबत ओळख झाली. मेधा मांजरेकर यांचे ही पहिली लग्न झाले होते.
मात्र, त्यांनी पहिल्या पतीला घटस्फोट दिला अशा रीतीने महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर या दोघांनी पुन्हा एकदा लग्न केले.