तुमच्याही तोंडाची चव गेलीये का ? हे घरगुती उपाय करून पहा,

बऱ्याचदा जेवणाची चवच लागत नाही,अशी तक्रार अनेकांची असते. स्वाद ग्रंथी चांगल्यारीतीने काम करत नसल्याने किंवा गंध घेण्याची क्षमता कमकुवत होते त्यांना ही समस्या जाणवते. दीर्घकाळ आजारी असल्याने आणि औषधांचे अधिक सेवन केल्यानेसुद्धा असे होत असते. तसेच व्यक्तीच्या तोंडाची चव जाण्याची इतरही अनेक कारणे आहेत. तोंडाची चव जाणे या समस्येची विविध कारणे आहेत. या समस्येवर आपण घरच्या घरी उपचार करू शकतो.
नेहमी भूक लागल्यावरच जेवण केल्यास तोंडाला चव येते. बळजबरीने, इमोशनल इटिंग किंवा इच्छा नसताना केलेल्या जेवणाचा शरीराला फार उपयोग होत नाही. जेवणात नेहमी विविधता असली की जेवणाची रूची वाढते. एकाच प्रकारचे जेवण केल्याने कंटाळा येतो. यासाठी दररोज काहीतरी नवीन असल्यास चव कायम राहते. हे खाद्य पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.
धूम्रपानासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे. तज्ज्ञांच्या मते धूम्रपान केल्याने स्वाद ग्रंथींची कार्यप्रणाली बाधित होते आणि जेवण करताना तोंडाला चव येत नाही. घाईघाईत किंवा टीव्ही पाहताना जेवण केल्याने चव कळून येत नाही. अन्न चावून-चावून खाल्ले पाहिजे. अन्नाचे कण लाळेत मिसळल्यानंतच चव येते.
वॉकिंग किंवा जॉगिंगही करावे. नियमितपणे व्यायाम केल्याने गंध घेण्याची क्षमता चांगली राहते. जेवणात सर्व रंगांचा समावेश असावा. रंग व्यक्तीला आकर्षित करतात आणि आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा फायदेशीर असतात. सर्व प्रकारच्या रंगांची फळे, भाज्यांचे भरपूर सेवन करावे. जेवणात एखाद्यावेळी मसाल्यांचा वापर केला पाहिजे. यामुळे जेवणाचा सुगंध वाढेल आणि खाण्याचीही तीव्र इच्छा होईल.
पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. कारण जीभ कोरडी पडल्यानेसुद्धा जेवताना तोंडाला चव राहात नाही. लागोपाठ एक-दोन घोट पाणी पीत राहावे, हे उपाय केल्यास तोंडाची चव कायम राहिल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.