मिथुन चक्रवर्ती यांची सून करते या प्रसिद्ध मालिकेत काम, दिसते अतिशय सुंदर आणि बोल्ड!!

मिथुन चक्रवर्ती यांची सून करते या प्रसिद्ध मालिकेत काम, दिसते अतिशय सुंदर आणि बोल्ड!!

डिस्को किंग मिथुन चक्रवर्ती यांची सून, मदालसा शर्मा तिच्या नवीन डान्स व्हिडिओ आणि ग्लॅमरस छायाचित्रांमुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहे. ती नेहनीच तिच्या इव्हेंटची छायाचित्रे किंवा व्हिडिओ शेअर करत असते. मदालसा शर्माने पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री ‘ये गलियां ये चौबारा’ गाण्यावर दमदार नृत्य करताना दिसत आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेच असा हा दमदार डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

चाहत्यांनी त्याला खूप प्रतिसाद ही दिला आहे. मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माचा हा डान्स व्हिडिओ लोकप्रिय टीव्ही शो ‘अनुपमा’च्या सेटवरचा आहे. मदालसा या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत काम करते. आतापर्यंत हा व्हिडिओ 78 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. मदालसा शर्माचे मिमोह चक्रवर्तीशी लग्न झालेले आहे.

मदालसा एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ती तेलुगु चित्रपटसृष्टीतली एक नामांकित अभिनेत्री आहे. मदलसा शर्मा सध्या लोकप्रिय टीव्ही शो अनुपमा या मालिकेत काव्या झावेरीची भूमिका साकारत आहे. 13 जुलैपासून प्रसारित झालेल्या या शोमध्ये मदालसाच्या भूमिकेला बरीच पसंती दिली जात आहे.

आम्ही तुम्हाला सांगातो की मदालसा शर्मा प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माता-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. 90 च्या दशकात महाभारतात शीला शर्माने देवकीची भूमिका केली होती.

जुलै 2018 मध्ये मदालसा शर्मा आणि मिमोह चक्रवर्ती यांचे लग्न झाले होते. 2009 सालचा तेलगू चित्रपट ‘फिटिंग’ मधून मदलसाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘शौर्य’ या कन्नड चित्रपटातही काम केले आहे. मदालसा सोशल मीडियावर नेहमीच खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. आणि तिच्या फोल्लोवेर्सची संख्या देखील खूप आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral