‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘शालिनी’ वाहिनी ने दिली ‘गुडन्यूज’

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘शालिनी’ वाहिनी ने दिली ‘गुडन्यूज’

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका या प्रेक्षणीय अशा झालेल्या आहेत. या मालिकेमध्ये जयदीप आणि गौरी यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडते. मात्र, या मालिकेमध्ये एक भूमिका अशी आहे की, जी सर्वांनाच आवडते ती म्हणजे शालिनी वहिनीची.

नकारात्मक भूमिका करणाऱ्या शालिनी वाहिनीचे खरे नाव माधवी निमकर असे आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे. माधवी निमकर हिचा जन्म 17 मे रोजी पुण्यातील खोपोली येथे झाला. 2010 साली तिचा विवाह विक्रांत कुलकर्णी यांच्याशी झाला असून त्यांना एक मुलगा देखील आहे.

तिला व्यायामाची खूप आवड आहे. त्यामुळे ती स्वतःला फिट ठेवत असते. तसेच फिटनेस टिप्स प्रेक्षकांना देत असतात. सोशल मीडिया न्यूज चॅनल वर माधवी योग गुरू म्हणून ओळखल्या जाते. शूटिंग पाहण्यासाठी माधवी निमकर बहिणीसोबत मुंबईला नेहमी येत असे. म्हणूनच तिला अभिनयाची आवड निर्माण झाली.

2007 साली गाणे तुमचे आमचे या कार्यक्रमासाठी तिला निवेदिका म्हणून बोलावण्यात आले होते. यामुळे तिचा आत्मविश्‍वास वाढला. आत्मविश्वास वाढल्याने माधवी निमकर हिने अभिनयात करिअर करण्याचे ठरवले. 2000 रूपये सोबत घेऊन तिने मुंबईचा मार्ग धरला. माधवी हिने अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

माधवी हिला स्टार प्रवाहची स्वप्नांच्या पलीकडले या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि नकारात्मक भूमिकेमुळे माधवी निमकर घराघरात पोहोचली. त्यानंतर अवघाची हा संसार, जावई विकत घेणे आहे, हम तो तेरे आशिक है या मालिकांमधूनही तिने आपल्या अभिनयाची चमक दाखवली.

मालिकांप्रमाणेच माधवी निमकर हिने संघर्ष, नवरा माझा भवरा, सगळं करून भागले, धावाधाव काही चित्रपटांमध्ये काम केले. त्यासोबतच अनेक नाटकांमध्ये तिने काम केले. महारथी हे तिचे गाजलेले नाटक आहे. आता माधवी निमकर हिने एक गुड न्यूज दिली आहे. आपल्याला वाटलं असेल की तिने बाळाला जन्म दिला किंवा गरोदर आहे की काय, मात्र असे काही नसून माधवी निमकर हिने एक नवीन फोन घेतला आहे.

हा फोन म्हणजे तिचा अॅपल चा फोन आहे. तिने या फोनबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे आणि हा फोन घेतल्याने मी खूप आनंदी आहे, असे म्हटले आहे. तर आपल्याला माधवी निमकर आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral