मालिकेतून ‘ब्रेक’ घेऊन फिरायला गेलेल्या अरुंधती सोबत घडली ‘अशी’ दुःखद घटना

मालिकेतून ‘ब्रेक’ घेऊन फिरायला गेलेल्या अरुंधती सोबत घडली ‘अशी’ दुःखद घटना

छोट्या पडद्यावर सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील पात्र प्रेक्षकांना खूप आवडतात. विशेष करून यामध्ये अरुंधती हे पात्र अनेकांना आवडते. तिची भूमिका मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे.

मधुराणी प्रभुलकर ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. या मालिकेतील अनिरुद्ध याची भूमिका देखील चांगली झालेली आहे. याचप्रमाणे इशा, गौरी यांच्या भूमिकाही प्रेक्षकांना आवडतात. आता विशेष करून यामध्ये असलेली संजनची भूमिका देखील खूप मस्त झालेली आहे.

मध्यंतरी मधुराणी प्रभुलकर हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ती शॉर्ट वर दिसली होती. त्यामुळे अनेकांनी तोंडात बोटे घातली होती. मालिकेत दिसणारी इतकी सोज्ज्वळ अरुंधती एवढी बोल्ड आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला होता.

आई कुठे काय करते या मालिकेमध्ये मधुराणी प्रभुलकर हिने अतिशय दर्जेदार काम केले आहे. या आधी देखील मधुराणी प्रभुलकर हिने अनेक चित्रपटातही काम केले आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात तिने एक छोटी भूमिका साकारली होती. तिची या चित्रपटातील भूमिका देखील लोकप्रिय ठरली होती. त्यानंतर अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील तिने केले आहे.

मात्र, मधुराणी हिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती आई कुठे काय करते या मालिकेतून. गेल्या दोन वर्षापासून ही मालिका छोट्या पडद्यावर सुरू आहे. ही मालिका काही दिवस सुरूच राहील. या मालिकेमध्ये मिलिंद गवळी हे आपल्याला दिसले आहेत. मिलिंद गवळी यांनी अनेक मालिका चित्रपटातही काम केले आहे.

मधुराणी प्रभुलकर ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी जाण्याचे नियोजन करत असताना तिच्यासोबत एक आता भयंकर प्रकार घडल्याचे समोर आले आहे. तिला ऑनलाईन गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. मधुराणी प्रभूलकर आपले पती प्रमोद प्रभुलकर यांच्यासोबत गणपतीपुळे येथे जाण्यासाठी तयारी करत होती

त्यांनी फोर स्टार हॉटेलमध्ये ऑनलाईन बुकींग केली. यासाठी 17 हजार रुपये त्यांनी ऑनलाईन भरली देखील. हे हॉटेल प्रसिद्ध राजकीय नेते रवींद्र फाटक यांचे आहे. ज्यावेळेस मधुराणी तिच्या पतीसोबत संबंधित हॉटेलवर पोहोचली, त्यावेळेस हॉटेलच्या स्टापने त्यांना बुकिंग झालीच नसल्याचे सांगितले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली.

उत्तर प्रदेशातील काही लोकांनी हॉटेलची वेबसाईट हॅक करून काहीजणांना एक लाख रुपयाला दंड घातल्याचे देखील समोर आले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकारामुळे मधुराणी आणि तिच्या पतीला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.

Team Hou De Viral