या मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत घेतलं भाड्याने घर, घराचं भाडं ऐकून चकित व्हाल

या मराठमोळ्या अभिनेत्रीने मुंबईत घेतलं भाड्याने घर, घराचं भाडं ऐकून चकित व्हाल

बॉलिवूडमध्ये एकेकाळी माधुरी दिक्षित (Madhuri Dixit) हिला धक धक गर्ल म्हणून ओळखल्या जात होते. आजही माधुरी दीक्षितच्या नावाचा उल्लेख करताना तिला धक धक गर्ल असेच म्हणतात. माधुरी दीक्षित-नेने हिने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट केली. यामध्ये तिने अनेक अभिनेत्यांसोबत काम केले.

विशेष म्हणजे तिने काम केलेल्या अभिनेत्यांमध्ये बाप आणि लेक यांचादेखील समावेश आहे. हे बाप आणि बाप आणि लेक म्हणजे अक्षय खन्ना आणि त्याचे वडील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना होत. विनोद खन्ना सोबत माधुरी दीक्षित हिने दयावान हा चित्रपट केला होता.

दयावान चित्रपटात तिने अनेक बोल्ड दृश्य दिली होती. त्यामुळे तिची चर्चा प्रचंड झाली होती. याशिवाय माधुरी दीक्षित-नेने हिने हम आपके है कौन, साजन यासारखे चित्रपटही केले. बेटा, देवदास यासह माधुरी दीक्षितचे अनेक चित्रपट हिट झाले. माधुरी दीक्षित हिने आपल्या करिअरमध्ये जवळपास सगळेच चित्रपट हिट दिले.

माधुरी दीक्षित हिच्या जमान्यामध्ये तिला टक्कर देण्यासाठी केवळ श्रीदेवी ही समोर होती. श्रीदेवी हिला सुपरस्टार पदाचा दर्जा त्यावेळेस देण्यात आला होता. मात्र, माधुरी देखील तिच्या तोडीस तोड अशी होती. माधुरी दीक्षित हिचे नाव संजय दत्त याच्या सोबत देखील जोडण्यात आले होते.

मात्र मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी अटक केल्यानंतर माधुरी हिने त्याच्यापासून दुरावा निर्माण केला. दिल पागल है हा यशराज बॅनरचा चित्रपट हिट राहिला. या चित्रपटाच्या काही दिवसानंतरच माधुरी दीक्षित हिने अमेरिकेत स्थित असलेले डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर माधुरी दीक्षित ही काही वर्ष अमेरिकेत स्थायिक झाली होती.

मात्र, कालांतराने मुलगा मोठा झाल्यावर ती परत आता भारतात आली आहे. भारतात आपल्या पतीसोबत ती म्हणजेच मुंबईत राहात आहे. श्रीराम नेने मुंबई महानगरपालिकेच्या एका रुग्णालयाचे काम देखील पहात असल्याचे सांगण्यात येते. मधुरीचे मुंबईत अनेक घरं आहेत. मात्र, असे असले तरी माधुरी आता भाड्याच्या घरात राहत असल्याची बातमी समोर आली आहे.

माधुरी दीक्षित हिने मुंबईत 5500 स्क्वेअर फुटाचे नवीन घर घेतले आहे. मुंबईतील महागड्या भागापैकी एक असलेल्या येथील एका इमारतीत हे घर आहे. 29 व्या मजल्यावर असलेल्या घरातून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही गोष्टी दिसतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातून अथांग समुद्र दिसतो.

माधुरी हिला वस्तू विशारद अपूर्वा मेहता यांनी अवघ्या 25 दिवसात घर तयार केले असून घराची संपूर्ण रचना माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांच्या मनाप्रमाणे हे घर तयार केले आहे. एका माहितीनुसार माधुरी हे घर भाड्याने घेतले असून या घराचा मासिक भाडं साडेबारा लाख रुपये इतका आहे.

तर आपल्याला माधुरी दीक्षित आवडते का? आणि माधुरी हिच्या घराबद्दल तुम्हाला काय वाटतं, आपण कमेंट मध्ये सांगू शकता.

Team Hou De Viral