चित्रपटसृष्टीला मोठा धक्का ! उपचारा दरम्यान ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

चित्रपटसृष्टीला मोठा धक्का ! उपचारा दरम्यान ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

90 च्या दशकामध्ये टीव्ही प्रत्येक घरात तर नव्हता. मात्र, काही घरातच टीव्ही हा आला होता. त्यावेळी हे मनोरंजनाचे खूप मोठे साधन समजले जायचे. त्याच वेळेस दूरदर्शनवर महाभारत आणि रामायण यासारख्या धार्मिक मालिका सुरू झाल्या होत्या.

रामायण आणि महाभारत यांना प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणात मिळायचा. महाभारत ही मालिका आजही तेवढ्याच आवडीने पाहिले जाते. महाभारत या महा मालिकेमध्ये काम करणाऱ्या एका कलाकाराचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. याबद्दलच आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत.

महाभारतामध्ये नंद ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. ही भूमिका प्रसिद्ध अभिनेते रसिक दवे यांनी साकारली होती. रसिक दवे यांचे नुकतच उपचारादरम्यान निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रसिक दवे यांची किडनी खराब झाली होती. त्यामुळे त्यांना गेले अनेक दिवसापासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्यांची अखेरीस प्राणज्योत मालवली. त्यांचा अंत्यविधी देखील करण्यात आला. यावेळेस मालिकेतील त्यांचे सहकलाकार आणि बॉलीवूडमधील अनेक व्यक्ती देखील सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. मृत्यू समयी त्यांचे वय केवळ 65 वर्षांचे होते. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची किडनी खराब झाली होती. त्यामुळे त्यांना वारंवार डायलिसिस देखील घ्यावे लागायचे.

अशाच त्यांना त्रास अधिक होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. पंधरा दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मात्र, अखेरीस डॉक्टरांचे प्रयत्न कमी पडले आणि त्यांचे निधन झाले. रसिक दवे यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी अभिनेत्री मुलगी केतकी दवे, मुलगी रिद्धी दवे आणि मुलगा अभिषेक दवे असा परिवार आहे.

दवे हे एक प्रसिद्ध अभिनेते होते. मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी मालिका चित्रपटांमध्ये त्यांनी आगळ्यावेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. संस्कार धरोवर अपनों की, सीआयडी आणि कृष्णा सारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी आपल्या भूमिकांची छाप सोडली होती. मात्र, त्यांना खऱ्या अर्थाने महाभारतातील नंद या भूमिकेसाठी ओळखल्या गेले.

त्यांची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. काही दिवसापूर्वी नच बलिये या शोमध्ये केतकी आणि रसिक हे दिसले होते. गेल्या दोन वर्षापासून रसिक दवे हे डायलिसिसवर होते. त्यामुळे त्यांना अधून मधून त्रास व्हायचा. आठवड्यातून तीन वेळा त्यांना रुग्णालयात जावे लागायचे. त्याच्या दोन्ही किडन्या या निकामी झाल्या होत्या.

मात्र गेल्या काही दिवसातून त्यांची प्रकृती अतिशय खराब झाली होती. त्यानंतर त्यांचे निधन झाले.

Team Hou De Viral