ही ठरली मालिका विश्वामधील महाराष्ट्राची ‘एक नंबर’ सुपरहिट जोडी

ही ठरली मालिका विश्वामधील महाराष्ट्राची ‘एक नंबर’ सुपरहिट जोडी

मराठी मालिका विश्वामध्ये अनेक कलाकार हे सध्या काम करत आहेत. मात्र, या मालिकात काम करणारे काही कलाकारच प्रेक्षकांना खूप आवडत असतात. यात अनेक कलाकारांच्या जोड्या देखील प्रेक्षकांना खूप आवडतात. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त आवडणारी जोडी कुठली याबद्दल माहिती सांगणार आहोत. त्याचबरोबर इतर जोड्यांबद्दल देखील माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया..

10) रंग माझा वेगळा या मालिकेतील ही जोडी दहाव्या क्रमांकावर आहे. कार्तिक आणि दीपा यांच्या जोडीची लोकप्रियता आता काही प्रमाणात घटत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

9) स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत काम करणारी जोडीदेखील लोकप्रिय झाली आहे. शांतनू आणि पल्लवीच्या जोडीला देखील प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.

8) जीव माझा गुंतला या मालिकेत काम करणारे मल्हार आणि अंतरा ही जोडी देखील आता लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या जोडीला देखील प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे.

7) राजा राणीची जोडी या मालिकेत काम करणारी संजीवनी आणि रंजीत यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. आता ही जोडी सातव्या क्रमांकावर आली आहे.

6) भाग्य दिले तू मला ही मालिका देखील सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत काम करणारी राज आणि कावेरी यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

5) मुरंबा या मालिकेत काम करणाऱ्या अक्षय आणि रमा यांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या दोघांची केमिस्ट्री आता खूप जुळताना दिसत आहे.

4) फुलाला सुगंध मातीचा ही मालिका देखील लोकप्रिय झाली आहे या मालिकेत काम करणारी शुभम आणि कीर्ती यांची जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते.

3) माझी तुझी रेशीमगाठ मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत काम करणारी नेहा आणि यश यांची जोडी देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. ही जोडी एकदम हिट ठरली आहे.

2) सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप आणि गौरी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.

1) नंबर एक वर शशांक आणि अपूर्वा यांची जोडी आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील त्यांची जोडी सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसत आहे, तर आपल्याला सगळ्यात जास्त जोडी कुणाची आवडते आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral