दक्षिण चित्रपट सृष्टी हादरली ! या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

दक्षिण चित्रपट सृष्टी हादरली ! या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

बॉलीवूड प्रमाणेच दक्षिण चित्रपटसृष्टीमध्ये देखील अनेक धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. आता देखील एका ज्येष्ठ अभिनेत्याची आई आणि एका बॉलीवूड अभिनेत्री हिच्या सासूचे नुकतेच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

एका दिग्गज व्यक्तीचे निधन झाल्याने बॉलीवूड सह दक्षिणे चित्रपटसृष्टी देखील हळहळली आहे. ही व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांची आई आणि नम्रता शिरोडकर यांच्या सासुबाई आहेत. गेल्या काही दिवसापासून अनेक कलाकार आपल्याला सोडून गेलेले आहे. आता देखील महेश बाबू यांच्या आईचे निधन झाले आहे.

महेश बाबू यांच्या आईचे नाव इंदिरा देवी होते. त्यांच्यावर गेला अनेक दिवसापासून उपचार सुरू होते, असे सांगण्यात येते. त्यांचे वय अंदाजे 70 ते 80 च्या घरात असल्याचे देखील बोलले जाते. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. बॉलीवूड प्रमाणेच दक्षिणाचे चित्रपट सृष्टीमध्ये देखील एका मागून एक धक्के बसत असल्याचे समोर येत आहे.

महेश बाबू यांच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. महेश बाबू याची आई इंदिरा देवी यांचे हैदराबाद येथे निधन झाल्याची ही बातमी समोर आली आहे. 28 सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून इंद्रा देवी यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना हैदराबाद येथील एका मोठ्या रुग्णाला दाखल करण्यात आले होते.

मात्र, त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. इंद्रा देवी या सुपरस्टार कृष्ण यांच्या पत्नी होत्या. महेश बाबू यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर इंद्रा देवी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आता त्यांच्या निधनानंतर पद्मालय स्टुडिओमध्ये सकाळी नऊ ते बारा या वेळेत अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

महेश बाबू यांच्या काही चाहत्यांनी ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. महेश बाबू हा सोशल मीडियावर त्याच्या आई सोबतचे फोटो नेहमी शेअर करत होता. काही दिवसापूर्वी त्याने इंद्रादेवी यांचा एक खास फोटो शेअर केला होता. मात्र, हा फोटो शेअर केल्यानंतर हा त्यांचा शेवटचा फोटो राहिला असेल, असे अनेकांनी म्हटले आहे.

या फोटोमध्ये महेश बाबू यांनी हॅ’पी बर्थडे अम्मा’ असे म्हटले होते. तसेच महेशने मदर्स डे ला देखील इंद्रा देवी यांचा खास फोटो शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या, तर महेश बाबू यांच्या दुःखात आपण सहभागी आहात का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral