प्रसिद्ध दिग्दर्शकाची प्रकृती अचानक खालावली, प्रकृती बाबत धक्कादायक खुलासा

आपल्या वादग्रस्त शैली आणि विधानाने कायमच चर्चेत राहणारे दिग्दर्शक निर्माती म्हणजे महेश भट.. महेश भट यांनी आजवर अनेक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. महेश भट यांचे अनेक चित्रपट हे जबरदस्त हिट राहिलेले आहेत. महेश भट यांना म्युझिकल किंग असे म्हणले जाते.
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटाचे संगीत हे प्रचंड लोकप्रिय झाले आहे. महेश भट यांनी काही वर्षांपूर्वी सडक हा चित्रपट केला होता. सडक या चित्रपटामध्ये संजय दत्त, पूजा भट्ट यांची भूमिका होती. या चित्रपटातील गाणे अतिशय लोकप्रिय असे झाले होते. संजय दत्त याला या चित्रपटातून मोठा ब्रेक मिळाला होता.
त्याचप्रमाणे सदाशिव अमरापुरकर यांनी देखील या चित्रपटात महाराणीची भूमिका साकारून सगळ्यांचे मन जिंकले होते. त्यानंतर महेश भट यांनी इम्रान हाश्मी म्हणजे आपला भाचा याला चित्रपटात लॉन्च केले आणि अनेक हिट चित्रपटाची निर्मिती केली. अतिशय व्हल्गर टाईपमध्ये असणारे त्यांचे हे चित्रपट प्रचंड हिट ठरले.
महेश भट यांनी काही वर्षांपूर्वी आपली मुलगी पूजा भट हिच्या सोबतच एक लीप लॉक सीन दिला होता आणि याबाबतचे एक पोस्टर त्यावेळेस प्रचंड धुमाकूळ घालून गेले. या पोस्टवर अनेकांना बोलते देखील केले होते. त्यानंतर महेश भट यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. रिया चक्रवर्ती हिच्या सोबतही त्यांचे नाव जोडले गेले होते.
त्याचप्रमाणे महेश भट्ट यांनी खाजगी आयुष्यात दोन लग्न केले आहेत. आता महेश भट्ट यांच्या प्रकृतबाबतची एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. महेश भट्ट हे काही दिवसापूर्वी मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयात दाखवण्यासाठी गेले होते.
त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया केली आहे. याबाबत त्यांचा मुलगा राहुल भट्ट यांनीही देखील माहिती दिली आहे. महेश भट्ट यांची प्रकृती आता ठीक असून ते चालण्याचा हळूहळू सराव करत असल्याचे देखील दिसत आहेत.