या कारणामुळे सनी देओल महेश भट्ट यांचे तोंडही नाही पाहत.. जाणून घ्या काय आहे कारण

अभिनेता सुशांच्या प्रकरणात महेश भट्ट यांचे नाव चर्चेत आले आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीसोबत त्यांचे व्हाट्सअप चॅट सर्वत्र सार्वजनिक झाल्याने भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी बॉलिवूड अनेक चित्रपट दिले आहेत. यामध्ये त्यांचा आशिकी हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतरही त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
काही वर्षांपूर्वी त्यांचा भाचा इम्रान हाश्मी यांच्यासोबत देखील त्यांनी अनेक चित्रपट केले होते. त्यांच्या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील गाणी होय. अतिशय सुमधुर गाणी महेश भट यांच्या चित्रपटात असतात. मात्र, वैयक्तिक आयुष्यामुळे देखील ते खूपच चर्चेत आले आहेत. अभिनेत्री व मुलगी पूजा भट हिच्यासोबत त्यांनी काही वर्षांपूर्वी लीप लॉक सिन दिला होता.
एका प्रसिद्ध मॅक्झिने त्याचे कव्हर फोटो प्रसिद्ध केले होते. त्यावेळी देखील त्यांची खूप चर्चा झाली होती आणि त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. नव्वदच्या दशकामध्ये भट्ट यांची खूप चलती होती. त्यांनी अनेकांना घेऊन चित्रपट चित्रपट करणे सुरू ठेवले होते. अशाच वेळी त्यांनी सनी देओल याला एका चित्रपटासाठी घेतले होते. त्या चित्रपटाचे नाव गुनाह असे होते. सनी याचा जन्म 19 ऑक्टोबर 1956 रोजी झाला.
1984 मध्ये सनी देओलचा बेताब हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अमृता सिंह हिने प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर महेश भट्ट यांनी सनी याला गुनाह या चित्रपटासाठी घेतले होते. मात्र, हा चित्रपट जवळपास पाच वर्षांनी प्रदर्शित झाला होता.या चित्रपटात त्याच्यासोबत डिंपल कपाडिया यांची भूमिका होती. त्यामुळे सनी चांगलाच भडकला होता.
सनी भडकण्याचे कारण देखील फार वेगळे आहे. महेश भट यांनी सनी याला त्यांच्या चित्रपटात घेतले होते. मात्र ते स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शन न करता दुसऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे आणि सनी याच्या चित्रपटाचे दिग्दर्शन हे त्यांचे साहाय्यक दिग्दर्शक करायचे. त्यामुळे सनी देओलचा पारा हा चांगला तापला होता. भट्ट चित्रपटाच्या सेटवर यायचे.
मात्र, मुख्य कलाकारांना न भेटतात निघून जायचे. त्यामुळे देखील सनी खूप चिडला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याने नाराजी व्यक्त केली होती. तसेच यापुढे कधीही भट्ट यांच्यासोबत काम करणार नसल्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार त्याने कधीही काम केले नाही.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.