या लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे झाले निधन

या लोकप्रिय मराठी अभिनेत्याचे झाले निधन

मराठी चित्रपट सृष्टीतील एक जबरदस्त अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे हे सध्या दुःखात आहेत. महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचे वर्धापकाळाने 96 वर्षी मुंबईत निधन झाले. शनिवारी मुंबईतील बोरिवली येथील स्मशानभूमी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश कोठारे, जेनमा, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे बालपण अतिशय कष्टामध्ये गेल्याचे सांगण्यात येते. आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी ते वेगवेगळे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.

दिवाळीच्या काळात गिरगावच्या रस्त्यावर त्यांनी आणि दिवाळीच्या इतर साहित्य विकण्याचे काम देखील केले. त्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ब्रिटिश बँक ऑफ द मिडल इस्टिया बँकेत नोकरी देखील केली. तब्बल चार दशके त्यांनी या बँकेमध्ये नोकरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवला. तसेच या बँकेतर्फे त्यांना परदेशात जाण्याची देखील संधी मिळाली होती.

नोकरी सांभाळत त्यांनी रंगभूमीची कला देखील जोपासली होती. इंडियन नॅशनल थिएटर या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचे अनेक प्रयोग त्यांनी केले होते. झुंजारराव या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. यामुळेच महेश कोठारे यांना आपल्या कुटुंबातूनच अभिनयाचा वारसा लाभला होता.

दे दणादण या चित्रपटामध्ये अंबर कोठारे यांनी खलनायकाची भूमिका अतिशय जबरदस्त रित्या साकारली होती, तर आता अंबर कोठारे यांचे निधन झाल्यानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.

Team Hou De Viral