‘ती माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक’, महेश कोठारे सोबत घडली दुःखद घटना

‘ती माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक’, महेश कोठारे सोबत घडली दुःखद घटना

यशाचं शिखर पाहिल्यानंतर आलेलं अपयश महेश कोठारेंनी पाहिलं. या अपयशचा सामना करताना त्यांनी आशा सोडली नाही. मराठी सिनेसृष्टीतील नंबर एकचे निर्माते असलेल्या महेश कोठारेंवर स्वत:चं राहतं घर विकण्याची वेळ आली होती. या पुस्तकात त्या प्रसंगाबद्दलही कोठारेंनी लिहिलं आहे. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. तसं कोठारे कुटुंबाच्या जीवनातही आले.

महेश कोठारेंनी यशाचं शिखर गाठलेलं. लागोपाठ सहा-सात सुपरहिट चित्रपट बनवले होते. तेव्हा आदिनाथ खूप लहान होता. तो दहावीत असताना महेश कोठारेंनी एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्या डोंगराखाली कोठारे कुटुंबानं पुढची दहा वर्षं काढली. इतकंच नव्हे तर कर्जामुळं त्यांनी राहतं घर विकलं होतं. कोठारे कुटुंबियांच्या डोक्यावर हक्काचं छप्परही उरलं नव्हतं.

काय घडलं होतं नेमकं?

१९९९मध्ये महेश कोठारेंनी ‘लो मै आ गया’ या बॉलिवूड चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अभिनेता गोविंदाचा भाचा विनय आनंद (vinay anand) यानं मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट करणं माझी मोठी चूक होती, हे स्वत: कोठारेही मान्य करतात. १५ वर्षाची मेहनत या चित्रपटामुळं वाया गेली होती. या चित्रपटानंतर महेश कोठारेंना प्रचंड अपमान , मनस्ताप सहन करावा लागला होता.

या चित्रपटामुळं आर्थिक नुकसानं प्रचंड झालं होतं. त्यामुळं आदिनाथच्या शिक्षणावर , करिअरवर त्याचा परिणाम झाल्याचं कोठारे सांगतात. त्याला एमबीए करायचं होतं. तो सर्वात कठिण काळ होता, असं कोठारे म्हणतात.
आदिनाथ म्हणतो की…

या कठिण काळाबद्दल आदिनाथ म्हणतो की, ‘त्या डोंगराच्या सावलीतही एका वादळाला झुंज देणाऱ्या पर्वतासारखे उभे राहाणारे माझे आई-वडील मी कधीच विसरू शकणार नाही’.

Team Hou De Viral