‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका वादाच्या भोवऱ्यात, त्या ‘सीन’ साठी महेश कोठारे यांनी मागितली माफी

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका वादाच्या भोवऱ्यात, त्या ‘सीन’ साठी महेश कोठारे यांनी मागितली माफी

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरू असलेली “सुख म्हणजे नक्की काय असतं” ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे. महेश कोठारे या मालिकेचे निर्माते असून वेळोवेळी ते आपल्या कलाकारांना मार्गदर्शन करत असतात. मात्र, आता ही मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने महेश कोठारे यांनी जाहीर माफी मागितली आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केलेला आहे.

“सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेने आता प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. ही मालिका टीआरपीच्या बाबतीत देखील खूप पुढे गेली आहे. या मालिकेमध्ये जयदीप- गौरी यांची केमिस्ट्री ही खूप जुळण्याचे पाहायला मिळत आहे. तरी या मालिकेमध्ये शालिनी हिचे कट-कारस्थान अजूनही सुरूच आहेत. तरी या मालिकेमध्ये आता एका नव्या पात्राची देखील एन्ट्री झाली आहे.

या पात्राचे नाव ज्योतिका असे आहे. ज्योतीका ही जयदीप याची पूर्व प्रेयसी आहे. तरी या मालिकेमध्ये वर्षा उसगावकर यांनी देखील अफलातून अशी काम केले आहे. मालिकेमध्ये आता जयदीप आणि गौरी यांचे चांगले जमत असून गौरी ही आता शिक्षण देखील घेत आहे. तिच्यामध्ये सुधारणा देखील होत आहे. त्यामुळे गौरी आता शालिनी ला पुरून उरणार असे दिसत आहे.

गेल्या काही भागांमध्ये शालिनी ही गौरी सोबत पैज लावते की एका आठवड्याच्या आत कोण कोणाला या घराच्या बाहेर काढून दाखवते. त्यानंतर आता यामध्ये कटकारस्थान देखील सुरु झाले आहेत. या मालिकेमध्ये जयदीप याची बहीण गौरीच्या कडून जयदीप त्याचे हस्ताक्षर एका कागदावर करून घेते. यामध्ये लाखो रुपयांची हेराफेरी होती. याची सूत्रधार सँडी ही होती.

मात्र, यामागे देखील शालिनी हिचा हात असल्याचे सांगण्यात येते. आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. त्यामुळे आता या मध्ये नेमक काय होणार आहे, हे लवकरच कळणार आहे. या मालिकेचे निर्माते महेश कोठारे आहेत. महेश कोठारे यांनी याआधी अनेक चित्रपट आणि स्वतः देखील अभिनय केला आहे. महेश कोठारे यांचा झपाटलेला हा चित्रपट आपल्याला आठवत असेल.

झपाटलेला चित्रपट यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांची देखील भूमिका होती. या चित्रपटानंतर त्यांनी पछाडलेला हा चित्रपट तयार केला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर महेश कोठारे आता मालिका क्षेत्रात देखील उतरलेले आहेत. गेल्या काही वर्षात त्यांनी अनेक मालिकांची निर्मिती देखील केलेली आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार देखील देत असतात.

“सुख म्हणजे नक्की काय असतं” या मालिकेचा 14 सप्टेंबर च्या भागांमध्ये एक गंभीर चूक झालेली आहे. हे जे पात्र होते या पात्राच्या ब्लाऊज वर गौतम बुद्धाचे छायाचित्र असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर याला अनेक संघटनांनी विरोध दर्शवला. तसेच याबाबत खुलासा करण्याची मागणी देखील त्यांनी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून निर्माते महेश कोठारे यांनी याबाबतचा एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

या व्हिडिओमध्ये ते जाहीर माफी मागताना दिसत आहेत. महेश कोठारे म्हणतात की, 14 सप्टेंबर च्या भागांमध्ये सँडी या पात्राच्या ब्लाऊज वर वंदनीय गौतम बुद्ध यांचे छायाचित्र प्रकाशित झाले आहे. ही अतिशय गंभीर चूक आहे. मात्र, कोणीही हेतुपुरस्सरपणे हा प्रकार केला नाही. नजरचुकीने हा प्रकार झाला असे सांगत त्यांनी भावना दुखावलेल्याची जाहीर माफी मागतो, असे त्यांनी सांगितले.

तसेच क्षमाशीलता या माध्यमातून आम्हाला आपण माफ करावे, असेही त्यांनी सांगितले. या पुढे अशी चूक कधीही होणार नाही, असेही महेश कोठारे म्हणाले.

Team Hou De Viral