महेश मांजरेकरांनी प्रसाद, अमृता आणि रुचिराला झाप-झाप झापलं, रुचिरा तर रडायला लागली

महेश मांजरेकरांनी प्रसाद, अमृता आणि रुचिराला झाप-झाप झापलं, रुचिरा तर रडायला लागली

कलर्स मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये आता चांगलीच रंगत चढत चालली आहे. चौथ्या पर्वमध्ये अनेक कलाकार हे सहभागी झाले आहेत.

अनेक कलाकार हे आता भांडताना देखील दिसत आहेत्यामुळे बिग बॉस अर्थात महेश मांजरेकर यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागत आहे आणि सगळ्यांना समजावून सांगावं लागत आहे काही स्पर्धक हे समजून सांगण्याच्या मनस्थितीत नसतील तर त्यांना ते अतिशय शेलक्या या शब्दात झापून देखील काढत आहेत.

बिग बॉसच्या तीन सत्रामध्ये आतापर्यंत आपण अनेक स्पर्धकांना सहभागी झाल्याचे पाहिले. अनेक जण वेगवेगळ्या पातळ्यावर आपला परफॉर्मन्स दाखवत होते. त्याचप्रमाणे ते वेगवेगळ्या टास्कमध्ये देखील सहभागी व्हायचे. मात्र, बिग बॉसच्या चौथ्या सत्रमध्ये सहभागी झालेले स्पर्धक हे काहीसे नवीन आहेत आणि ते तरीदेखील चांगला खेळ करताना दिसतात.

आता महेश मांजरेकर यांनी नुकतीच एक चावडी घेतली. या चावडीमध्ये त्यांनी सगळ्याच कलाकारांना चांगले झापून काढल्याचे समोर आले आहे. बिग बॉसच्या घरामध्ये महेश मांजरेकर यांनी आता सगळ्या स्पर्धकांची शाळा घेतली. यामध्ये अमृता देशमुख हिला सुरुवातीला त्यांनी चांगलेच झापून काढले.

झापून काढताना महेश मांजरेकर अमृताला म्हणाले की, तू सगळ्यांची वकील बनू नको. त्रिशूल याला देखील महेश मांजरेकर यांनी झापले आणि तो असाच घरात आला आहेस का असे म्हटले. त्यानंतर प्रसाद याला देखील महेश मांजरेकर यांनी चांगलेच झापले. प्रसाद याला महेश मांजरेकर म्हणाले की, तुझ्यामुळे तुझा ग्रुपचा डाऊन फॉल झाला आहे.

नुकत्याच झालेल्या चावडीमध्ये अमृता धोंडगे हिने देखील आपले गा-हाणे मांडले. किचनमध्ये सकाळी सकाळी मला कोणीही मदत करत नाही. मात्र, तिचे हे म्हणणे रुचिरा हिने खोडून काढले. अमृता हिला तिचे म्हणणे पटले नाही. त्यानंतर रुचिरा हे ढसाढसा शो मध्येच रडायला लागली. योगेश याचा केवळ कामासाठीच वापर करण्यात येतो, असे देखील महेश मांजरेकर यांनी या वेळी सांगितले.

तर महेश मांजरेकर यांची आजची चावडी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral