‘तू मूर्ख आहेस का ?’, ह्या स्पर्धकावर चांगलेच भडकले महेश मांजरेकर

‘तू मूर्ख आहेस का ?’, ह्या स्पर्धकावर चांगलेच भडकले महेश मांजरेकर

कलर्स मराठी या वाहिनीवर बिग बॉसचे चौथ पर्व सुरू झाले आहे. या बिग बॉस मध्ये कोण कोण सहभागी होणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. अनेक कलावंताचे नाव यासाठी चर्चेत आलेले होते. बिग बॉस मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कलाकारांनी आपल्या हाताच्या मालिकादेखील सोडल्याची सांगण्यात येते.

हिंदी बिग बॉसच्या धर्तीवर मराठी बिग बॉस गेल्या तीन दशकांपासून सुरू आहे. गेल्या दोन पर्वामध्ये अनेक कलाकारांना आपण यामध्ये पाहिलेले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या देखील बिग बॉसमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे हा एक विक्रमच म्हणावा लागेल. किशोरी शहाणे यांनी देखील बिग बॉस मध्ये आपला सहभाग नोंदवला होता.

त्यांनी अफलातून असा परफॉर्मन्स बिग बॉस मध्ये दाखवला होता. प्रसिद्ध अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर या बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहेत. महेश मांजरेकर यांना नुकताच कॅन्सरसारख्या दुर्धर आजार झाला होता. यातून ते आता सावरले आहेत. बिग बॉस चौथे पर्व सुरू झाले आहे. याबाबतचा प्रोमो देखील आता अनेक ठिकाणी सुरू आहे.

महेश मांजरेकर या प्रोमोमध्ये अतिशय बारीक झाल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांच्यामध्ये तोच उत्साह दिसत आहे. हिंदी बिग बॉस मध्ये अभिनेता सलमान खान हा सूत्रसंचालन करत असतो, तर मराठीमध्ये महेश मांजरेकर दोघेही अतिशय जवळचे मित्र आहेत. मराठी बिग बॉस देखील आता अनेक मालिकांना मात देणार की काय, अशी चर्चा सुरू झालेली आहे.

कारण कलर्स मराठी वर बिग बॉस सुरू झाल्यानंतर इतर वाहिन्या वरील मालिकांवर त्याचा परिणाम जाणवेल, असे सांगण्यात येत होते. मात्र, असे सध्या तरी काही झाले नाही, असे दिसत आहे. बिग बॉसमध्ये वेगवेगळे स्पर्धक सहभागी झाले आहेत. या स्पर्धकांना वेगवेगळ टास्क देखील देण्यात येतात. असाच एक टास्क नुकताच निखिल राजेशिर्के याला देण्यात आला होता.

निखिल राजेशिर्के याला हा टास्क देण्यात आला. त्यानंतर तो सपशेल फेल गेल्याचे देखील दिसत आहे. त्यावर महेश मांजरेकर खूप चिडल्याचे देखील दिसत आहे. तर नेमक काय प्रकरण आहे. आपण जाणून घेऊया. बिग बॉसमध्ये लवकरच हे दाखवण्यात येणार आहे. याबाबत प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

यामध्ये महेश मांजरेकर निखिल याला म्हणत आहेत की तुझ्या मते सगळ्यात चांगला कोण आहे, त्यावर निखिल हा सगळ्यांचे फोटो लावून सगळेच माझ्यासाठी चांगले आहेत, असे म्हणत आहे. निखिल याच्या या वक्त्यावर महेश मांजरेकर हे प्रचंड चिडल्याचे दिसत आहेत. महेश मांजरेकर त्याला म्हणत आहेत की, अरे तू मूर्ख आहेस का? तुला चांगलं याचा अर्थ कळतो का? जो अप्रतिम आहे, जो उत्कृष्ट आहे त्यालाच आपण चांगलं म्हणू शकतो.

सगळेच कसे काय चांगले होऊ शकतात. तुला चांगलं या शब्दाचा अर्थ कळतो का? असे ते म्हणत आहेत. त्यामुळे आता महेश मांजरेकर निखिल याच्यावर कशा पद्धतीने पुन्हा चिडतात हे आपण लवकरच पाहणार आहोत.

Team Hou De Viral