‘निघ माझ्या कार्यक्रमातून…’, महेश मांजरेकर मेघा घाडगे वर चांगलेच भडकले

‘निघ माझ्या कार्यक्रमातून…’, महेश मांजरेकर मेघा घाडगे वर  चांगलेच भडकले

मराठी बिग बॉस चौथ सत्र सुरू होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. आता अनेक स्पर्धक या शोमध्ये चांगल्या प्रकारे खेळ खेळत आहेत. मात्र, काही स्पर्धक हे अजूनही चांगला खेळ करताना दिसत नाहीत. त्यामुळे आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकर या स्पर्धकांना चांगलेच सुनावतात.

आता देखील एका स्पर्धकाला महेश मांजरेकर आठवड्याच्या चावडीवर चांगले सुनावले असल्याचे समोर आले आहे. आताही स्पर्धक म्हणजे मेघा घाडगे हिला देखील मांजरेकर यांनी चांगलेच झापले असल्याचे बोलल्या जात आहे, तर नेमके काय प्रकरण आहे जाणून घेऊया..

बिग बॉसच्या शोमध्ये अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यामध्ये तेजश्री लोणारे, समृद्धी जाधव, योगेश जाधव, डॉक्टर रोहित शिंदे, रुचिरा जाधव, प्रसाद जवादे, किरण माने, यशश्री मसुरेकर, मेघा घाडगे, विकास सावंत यांच्यासह अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. या बिग बॉसच्या घरामधून अलीकडेच निखिल राज शिर्के हा बाहेर पडला आहे.

निखिल हा बाहेर पडल्यानंतर त्याने विकास सावंत आणि किरण माने यांच्यामध्ये देखील आग लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देखील अनेक जण करताना दिसत आहेत. किरण माने हे देखील अतिशय चर्चेत असलेले अभिनेते आहेत. कारण की मुलगी झाली हो या मालिकेमध्ये त्यांचा प्रचंड वाद झाला होता.

त्यानंतर त्यांना या मालिकेतून बाहेर काढण्यात आले होते. आता किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यात देखील या शोमध्ये प्रचंड वाद झाल्याचे पाहायला मिळाले. अपूर्वा हिने किरण माने यांना चांगले सुनावले होते. त्यानंतर अपूर्वा नेमळेकर हिला महेश मांजरेकर यांनी आठवड्याच्या चावडीवर चांगलेच सुनावले होते.

आता देखील आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी मेघा घाडगे हिला चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळणार आहे. कारण मेगा गाडगे ही योगेश जाधव याच्यासोबत अतिशय वाईट पणे वागलेली आहे, तर आठवड्याच्या चावडीवर महेश मांजरेकर तिला म्हणताना दिसत आहेत की, तू योगेशच्या सोबत अतिशय फालतूपणे बोलत होतीस. तू नेहमीच अशी का करत आहेस.

तू देखील त्या अपूर्वा सारखेच वागत आहेस का? तुला काही कळत नाही का? असे खेळू नका. नाहीतर बिग बॉस हे सगळं काही पाहत आहेत. तुम्हाला प्रेक्षक नाही तर घरचा रास्ता दाखवतील, असे महेश मांजरेकर यांनी मेघा घाडगे हिला सुनावले. मात्र, त्यानंतर मेघा घाडगे यांच्या खेळण्यांमध्ये काही फरक पडतो का? हे पाहावे लागेल.

Team Hou De Viral