सतत उभे राहिल्याने महिलांना होऊ शकतो हा धोकादायक आजार. जाणून घ्या कुठला आहे तो..

सतत उभे राहिल्याने महिलांना होऊ शकतो हा धोकादायक आजार. जाणून घ्या कुठला आहे तो..

आजवर आपण महिलांना होणाऱ्या अनेक आजारांची माहिती वाचली असेल. ब्रेस्ट कॅन्सर, त्वचेचे रोग आणि इतर रोगाबद्दल आपण माहिती वाचली असेल. मात्र, असे काही आजार आहेत की याची माहिती फार कमी लोकांना आहे आणि हा आजार महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. गरोदरपणामध्ये महिलांना हा आजार जडू शकतो.

आज चाळीशी पार केलेल्या महिलांना हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मात्र, सध्या तिशी पार केलेल्या महिलांनादेखील हा आजार बळावू लागलेला आहे. हा आजार म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स होय. हा आजार म्हणजे पायावरील नसा या काळे पिवळे होतात. आणि त्यावर गाठी होतात. यावर सध्या डॉक्टरांकडे उपचार उपलब्ध आहेत. मात्र, त्याचे परिणाम हे काही प्रमाणात होत असतात. त्यामुळे यावर काळजी घेणे हाच एक उपाय असल्याचे देखील अनेक जण सांगतात.

होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक मध्ये काही यावर उपचार आहेत. तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे महिलांना खूप त्रासाला सामोरे जावे लागते. व्हेरिकोज वेन झालेल्या महिलांना खूप पाय दुखीचा त्रास होतो. वेदना होतात. त्यामुळे आपण स्वतःची काळजी घेऊन यावर मात करू शकता. म्हणजेच आहेत तेवढंच आजार ठेवू शकता. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स बाबत घ्यावयाची काळजी याबाबत सांगणार आहोत.

1) व्यायाम : जर आपल्याला व्हेरिकोज वेन जडला असेल तर आपण नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. म्हणजे पाय वर खाली घेणे, थोडे चालणे. त्यामुळे रक्ताभिसरण योग्य प्रकारे होऊन आपल्या नसा जशा आहेत तशाच राहतील. म्हणजे हा आजार आहे तेवढच राहिल, वाढणार नाही.

2) गरम पाण्यात मीठ टाकून शेकणे : व्हेरिकोज व्हेन्स झालेला आहे तर आपण गरम पाण्यात मीठ टाकून त्याचा शे क घेऊ शकता किंवा गरम पाण्यात मीठ टाकून पायमध्ये सोडून देखील बसू शकता. आपल्या नसा मोकळ्या होतील आणि आपला व्हेरिकोस आहे तेवढ्या प्रमाणत स्थिर राहील.

3) अधिक उभे न राहणे : जर आपल्याला व्हेरिकोज व्हेन्स जडलेला आहे, तर आपण अधिक प्रमाणात उभे राहून कामे करू नये. आपण बसून कामे करावे. उभे राहून कामे केल्याने आपल्या नसावर ताण पडतो आणि आपला व्हेरिकोज व्हेन्स वाढू शकतो.

4) पायाखाली गादी ठेवून झोपणे : जर आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे, तर आपण पायाखाली गा दी ठेवून झोपावे. जेणेकरून आपले रक्ताभिसरण हे चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि आपला आजार हा अधिक वाढणार नाही.

5) मालिश : जर आपल्याला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे, तर आपण खोबरे तेल त्यात मीठ टाकून मालिश करावी. हा प्रयोग आपल्याला रोज करावा लागेल. असे केल्याने आपला व्हेन्स अधिक प्रमाणात वाढणार नाही आणि आपल्याला त्रास होणार नाही.

6) स्टॉकिंग : आपण बाजारात मिळणाऱ्या स्टॉकिंग घेऊन त्या घालाव्या आणि त्याचा वापर करावा. असे केल्याने आपल्या व्हेरिकोज व्हेन्स या वाढणार नाहीत. याचा खूप मोठा आधार होतो. स्टॉकिंग घातल्याने आपण काही वेळ उभे देखील राहू शकतो. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेऊन हे उपचार करावेत.

7) डॉक्टरांचा सल्ला : जर आपल्या व्हेरिकोज व्हेन्स या खूप वाढलेले असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्या ऑपरेशन करून काही प्रमाणात ठीक करता येऊ शकतात. मात्र, याची काही शंभर टक्के खात्री देता येत नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral