‘माझी तुझी रेशीमगाठी’ च्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी ! लंडनमध्ये ‘नेहा’ बरोबर घडली दुःखद घटना

अभिनेत्री प्रार्थना बाहेरही सध्या माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच चर्चा झाली आहे. मात्र, याआधी प्रार्थना बेहेरे हिने बॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. तसेच तिने मराठी मालिका व चित्रपट देखील खूप काम केले आहे. तिने पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले आहे. ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती.
त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या चित्रपटाला राज्यामध्ये प्रचंड यश मिळाले होते. प्रार्थना बेहेरे हिला काही पुरस्कार देखील या चित्रपटासाठी मिळाले होते. प्रार्थना ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. तसेच आपले फोटो देखील ती या माध्यमातून शेअर करत असते.
आपले विचार देखील ती मांडत असते. काही महिन्यांपूर्वी तिने आपला लहानपणीचा फोटो शेअर केला होता. मात्र, हा फोटो अनेकांना ओळखता आला नाही. प्रार्थना बेहेरे हिने आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केल्याने काही जणांनी तिच्यावर खिल्ली उडवणाऱ्या कमेंट देखील केल्या होत्या. त्यामुळे प्रार्थना ही चांगलीच भडकली होती.
त्यानंतर तिने काही जणांना सुनावून देखील दिले आणि यानंतर आपल्या प्रोफाईल वर कमेंट करायची नाही, असेही ती म्हटले होते. प्रार्थना बेहेरे हिने अभिषेक जावकर याच्या सोबत लग्न केले आहे. अभिषेक हा देखील चित्रपट सृष्टीशी संबंधितच आहे. तो दक्षिणेमध्ये चित्रपटाचा डिस्ट्रीब्यूटर आहे. अभिषेक याने डब्बा या चित्रपटाची निर्मिती केली होती.
या दोघांची जोडी अतिशय परफेक्ट असून त्यांची केमिस्ट्री देखील खूप जुळत असल्याचे सांगण्यात येते. आता प्रार्थना बेहेरे हिने काही दिवसांसाठी माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून ब्रेक घेतला आहे आणि आपल्या पतीसोबत ती लंडन येथे फिरायला गेली आहे. त्यामुळे ती मालिकेत दिसणार की नाही अशी शंका उपस्थित करण्यात येत होती.
मात्र, असे काही झाले नाही. लंडन येथून तिने अनेक भागांचे चित्रीकरण केले आहे. हे सध्या दोघेही लंडनमध्ये खूप मज्जा मस्ती करताना दिसताहेत. प्रार्थना बेहेरे लंडनहून आपले अनेक व्हिडिओदेखील शेअर करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती अतिशय जबरदस्त अशी दिसत आहे. मात्र नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला.
या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक दुःखद घटना घडल्याचे समोर आलेले आहे. हा व्हिडिओ शेअर करत असताना प्रार्थना तिच्या डोक्याला जोरात मोबाईल लागला आणि तिला मग त्या ठिकाणी टेंगूळ आले. त्यावर प्रार्थना हिने कॅप्शन देखील अतिशय मजेशीर दिले आहे.
टेंगूळ ऑल माय head असे तिने म्हटले आहे आणि थंड पाण्याने ते शेकताना दिसत आहे, तर प्रार्थना बेहेरे आपल्याला आवडते का? आम्हाला नक्की सांगा.