‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेहा पूर्णपणे बदलली, पहा ही आहे नवीन नेहा

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेहा पूर्णपणे बदलली, पहा ही आहे नवीन नेहा

झी मराठी या वाहिनीवर माझी तुझी रेशीमगाठ मालिका गेल्या सात ते आठ महिन्यापासून सुरू आहे. या मालिकेला अपेक्षित असा टीआरपी घेण्यात यश आले नाही, त्यामुळे या मालिकेची वेळ बदलण्यात आली, अशी चर्चा रंगली आहे.

तर या मालिकेमध्ये दिग्गज कलाकार सहभागी झाल्याने देखील ही मालिका लवकर बंद करण्यात येते की, काय अशी शंका अनेकांना उपस्थित झाली. कारण की आता कोरोना महामारीचा उद्रेक हा थोडा कमी झाला आहे आणि या मालिकेमध्ये दिग्गज कलाकार सहभागी असल्याने त्यांना इतरत्र भूमिका मिळाल्या आहेत. त्यामुळेच ते मालिकेतून काढता पाय घेतात का? अशी शंका देखील अनेकांना आली होती.

मात्र, या मालिकेची वेळ फक्त बदलण्यात आली आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये आपल्याला श्रेयस तळपदे हा अनेक दिवसानंतर दिसला आहे, तर या मालिकेमध्ये प्रार्थना बेहेरे ही देखील अनेक दिवसानंतर दिसली आहे. या मालिकेमध्ये इतर भूमिका देखील आहेत. यामध्ये आपल्याला संकर्षण कराडे, प्रदीप वेलनकर या कलाकारांच्या भूमिका देखील दिसतात.

श्रेयस तळपदे याने या मालिकेत यशची भूमिका केली आहे, तर प्रार्थना बेहेरे हिने नेहाची भूमिका केली आहे, तर संकर्षण याने समीर ही भूमिका केली आहे. तर आजोबाच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रदीप वेलणकर हे दिसले आहेत. यापूर्वी आजोबाच्या भूमिकेत मोहन जोशी हे दिसत होते. मात्र, त्यांनी मध्येच ही मालिका सोडली आहे.

प्रार्थना बेहेरे ही अतिशय बोल्ड आणि ब्युटीफुल, ग्लॅमरस अशी अभिनेत्री आहे. अनेक दिवसानंतर ती या मालिकेत काम करत आहे, तर श्रेयस तळपदे याने देखील छोट्या पडद्यावर अनेक वर्षानंतर पुनरागमन केले आहे. श्रेयस तळपदे याने आभाळमाया या मालिकेत सुरुवातीला काम केले होते. वीस वर्षांपूर्वी ही मालिका आली होती. त्यानंतर तो छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसू लागला आहे.

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमध्ये आता नवीन ट्रॅक पाहायला मिळणार आहे. यश आणि नेहा यांचा अपघात झाल्यानंतर नेहा ही बेपत्ता झाली आहे. त्यामुळे आता नेहा ही काही सापडत नाही, असा समज सगळ्यांनी करून घेतला आहे. मात्र, आता नेहा ही पुन्हा एकदा मालिकेत परतणार आहे. मात्र, आता ती परतल्यानंतर तिचा लुक हा बदललेला दिसणार आहे.

ती आता एकदम मॉडर्न अंदाजमध्ये आपल्याला मालिकेत दिसणार आहे. पूर्वी साडी आणि साधी ड्रेस घालणारी नेहा ही मात्र आता एकदम ग्लॅमर स्वरूपामध्ये दिसणार आहे. त्यामुळे ती जुनी नेहा आहे का? कोणी दुसरी अजून व्यक्ती आहे, हे आपल्याला काही दिवसातच स्पष्ट होणार आहे, तर आपण माझी तुझी रेशीमगाठ मालिका पाहतात का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Team Hou De Viral