‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये होणार या दिग्गज अभिनेत्रीची एन्ट्री ?

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये होणार या दिग्गज अभिनेत्रीची एन्ट्री ?

सध्या झी मराठीवर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. या मालिकेमध्ये अनेक वर्षानंतर अभिनेता श्रेयस तळपदे हा काम करत आहे. श्रेयस तळपदेने या मालिकेमध्ये यश ही भूमिका साकारली आहे. तर या मालिकेमध्ये नेहाच्या भूमिकेत आपल्याला प्रार्थना बेहरे ही दिसत आहे.

प्रार्थना बेहेरे हिने देखील अनेक चित्रपटात या आधी काम केलेले आहे. महाराष्ट्र ढाबा भटिंडा हा चित्रपट खुप गाजला होता. अवधूत गुप्ते याने या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर आता मालिका ची एन्ट्री घेतली आहे. तर श्रेयस तळपदे याने देखील काही वर्षांपूर्वी मालिकांमध्ये काम केले होते.

मात्र, त्यानंतर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. काही वर्षांपूर्वी आलेला ‘सावरखेड एक गाव’ हा मराठी चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. या चित्रपटात त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर हिंदीमध्ये आलेला इक्बाल हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता.

त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. फराह खानच्या ओम शांती ओम या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका त्याला मिळाली होती. अतिशय छोटी असलेली भूमिका देखील त्याने अतिशय व्यवस्थित रित्या साकारली होती. त्यानंतर रोहित शेट्टीच्या गोलमाल सीरिजमध्ये देखील त्याने काम केले.

याशिवाय इतर हिंदी चित्रपटातही त्याने काम केले. मात्र, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये त्याची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्याची आणि नेहाची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. त्याचप्रमाणे या मालिकेमध्ये परी ही भूमिका देखील प्रेक्षकांना अतिशय भावली आहे. ही भूमिका बालकलाकार मायरा वायकुळने केलेली आहे.

मायरा वायकूळ ही अतिशय छान प्रकारे या मालिकेत काम करत आहे. त्याचप्रमाणे या मालिकेत समीरच्या भूमिकेमध्ये संकर्षण कराडे हा दिसला आहे. मध्यंतरी तो ही मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, असे काही झाले नाही. त्याचप्रमाणे मोहन जोशी यांची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडते.

आता या मालिकेमध्ये एका दिग्गज अभिनेत्रीची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. याबाबतची आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सोनाली कुलकर्णी आहे. सोनाली कुलकर्णी हिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती प्रार्थना बहेरे सोबत डान्स करताना दिसत आहे. सोनाली कुलकर्णी हिने तिला सरप्राईज दिले आहे. या वेळेस प्रार्थना बेहेरे म्हणत आहे की, मला काहीच माहित नाही. सोनाली कुलकर्णी सेटवर कशी काय आली. आणि सर्व जण सांगत आहेत की, आता मालिकेत ती काम करणार आहे.

त्यानंतर सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे दोघेही डान्स करू लागतात. व्हिडिओच्या शेवटी मध्ये प्रार्थना बेहेरे ही सांगते की, सोनाली कुलकर्णी आपल्याला या मालिकेत दिसणार नसून ती केवळ प्रमोशनसाठी या मालिकेत येणार आहे. सोनाली कुलकर्णी चा पांडू हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

पांडू चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती मालिकेत आली होती. पांडू चित्रपटामध्ये ती उषा ही भूमिका साकारणार आहे, तर आपल्याला सोनाली कुलकर्णी आवडते का? ते नक्की सांगा.

Team Hou De Viral