‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून ‘या’ हा अभिनेता घेणार ब्रेक, समोर आले मोठे कारण

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून ‘या’ हा अभिनेता घेणार ब्रेक, समोर आले मोठे कारण

झी मराठी या मराठी वाहिनीवरील “माझी तुझी रेशीमगाठ” ही मालिका काही दिवसांपूर्वीच सुरू झाली असून ती प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. उत्कृष्ट कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिकाअतिशय दमदार बनली आहे. या मालिकेतील अनुभवी कलाकारांमुळे ही मालिका उत्कृष्ट होत असताना आपणास दिसत आहे.

कमी वेळेत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांना अतिशय आवडली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमधील परी आणि यश या दोघांमधील मैत्रिचे नाते प्रेक्षकांना खूपच आवडलं आहे.

यश म्हणजेच श्रेयसचे आजोबा हे देखील नाते अधिक घट्ट असल्यामुळे हे , मालिकेतील रंजकता तसेच नात्याची वीण अधिक घट्ट होत आहे आजोबाचे पात्र म्हणून जोशी यांनी साकारल आहे. सर्वात महत्वाचे या मालिकेतील दोन पात्र आहेत. परी आणि समीर. आजोबा समीरला यशची बायको म्हणत असतात.

समीर आणि यश हे दोघं नवरा-बायको सारखे सतत सोबत असतात. त्याच्यामुळे आजोबा थट्टेने समीरला तुझे नाव समीर ऐवजी समीरा हवे होते असे चिडवत असतात. त्यावर समीर देखील हसतो. समीर देखील आजोबांना जग्गू जग्गू या नावाने बोलत असतो. या दोघांमध्ये मैत्रीचे नाते आहे.

आता यश आणि नेहा हे दोघांना जाणीव होत नसते की ते एकमेकांच्या प्रेमात पडत आहे. पण आजोबा आणि समीरला मात्र ही गोष्ट जाणवत असते. यावरून ते दोघे नेहमीच यशला चिडवत असतात. अतिशय हसते खेळते वातावरण समीर त्याच्या अवतीभवती ठेवत असतो. एक उत्कृष्ट मित्र म्हणून समीर यशसाठी जमेल तो प्रयत्न आणि मदत करत असतो.

सध्या तो मालिकेत यशच्या सांगण्यावरून ऑफिसमध्ये तोच बॉस असल्याचे सांगतो. मित्रासाठी म्हणजेच यशसाठी समीर काहीही करण्यास तयार असतो. असा हा समीर म्हणजेच संकर्षण कराडे आता लवकरच मालिकेतून निरोप घेणार आहे अशी चर्चा सर्वत्र आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवसांपासून सिनेमागृह तसेच नाट्यगृह बंद होते.

परंतु आता नाट्यगृह सुरू झाल्यामुळे समीर या मालिकेतून काही दिवसांसाठी निरोप घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संकर्षण याची प्रमुख भूमिका असलेले नाटक “तू म्हणशील तसे” चे प्रयोग आता जोमाने सुरू होणार असल्यामुळे तो काही दिवसांसाठी या मालिकेतून निरोप घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

असे म्हटले जाते की या मालिकेचे लेखन संकर्षण करत आहे. संकर्षण तू म्हणशील तसे नाटकांच्या प्रयोगातून जसा वेळ मिळेल तसे माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या शूटिंगसाठी वेळ देणार आहे. त्यामुळे आता तो या मालिकेत नसल्यामुळे त्याला प्रेक्षक मिस करतील का किंवा दोन्ही ठिकाणी तो चित्रीकरण करुन आपली उपस्थिती ठेवेल का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

Team Hou De Viral