बोट मोडण्याची सवय चांगली की वाईट? तुम्ही सुद्धा असं करता का? जाणून घ्या दुष्परिणाम

बोट मोडण्याची सवय चांगली की वाईट? तुम्ही सुद्धा असं करता का?  जाणून घ्या दुष्परिणाम

अनेकदा झोपेतून उठल्यावर अनेकांना आळस देण्याबरोबरच आपल्या पाठ आणि हाताची बोटे मोडण्याची सवय असते. ही सवय भविष्यामध्ये आपल्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकते, असा नुकताच एक अहवाल प्रकाशित झाला आहे.

या अहवालामध्ये हाताची बोटे मोडणे हे आपल्या शरीरासाठी अपायकारक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जर आपण अशी सवय बाळगत असाल तर ती ताबडतोब बंद केली पाहिजे, असे देखील अनेकांनी व काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

निसर्गाने मानवी शरीराची रचना ही अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली आहे. मानवी शरीरामध्ये पंचेंद्रिय असतात. याचे कार्य वेगवेगळे असतात. सगळ्या अवयवांचे कार्य हे प्रमाणिक करत असतात. डोळे, नाक, तोंड, कान याचप्रमाणे इतर अवयव आपले कार्य करत असतात. हाताची बोटे देखील आपले कार्य आपल्या पद्धतीने करत असतात.

आपल्या हाताचा उपयोग आपल्यासाठी जेवणाबरोबरच इतर कामांसाठी देखील करता येतो. एका जागी बसून राहिल्याने आपली हाडं हे जाम होतात. त्यामुळे आपण कायम हालचाल केली पाहिजे, आपण जेवढी हालचाल कराल. तेवढं आपण निरोगी राहालं असे पूर्वीपासून आपल्याला सांगण्यात येते.

आयुर्वेदात देखील सांगण्यात आले आहेत. नियमित प्रमाणे आपण व्यायाम केला पाहिजे. जर आपण आठ तास ऑफिस मध्ये काम करत असाल आणि एकाच जागी बसत असाल तर ते आपल्यासाठी धोकादायक ठरते. त्यामुळे अथून मधून आपण आपल्या शरीराची हालचाल केली पाहिजे. त्यामुळे आपले शरीर हे निरोगी बनते.

त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये किमान 20 ते 30 मिनिटे आपण पायी चाललं पाहिजे. यामुळे आपले पाय मजबूत होऊन इतर आपण आपल्याला रोग होत नाहीत आणि आपले हाड हे चांगले राहतात. जर आपल्याला बोट बोलण्याची सवय असेल तर आपण ती तातडीने बंद केली पाहिजे. नाहीतर याचा आपल्याला ञास होऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी एका देशांमध्ये असाच एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये तीनशे लोकांवर सर्वेक्षण करण्यात आले. तीनशे लोकांवर बोटं मोडणे याबाबत हे सर्वेक्षण झाले. त्यामध्ये असे आढळले की सामान्य लोकांपेक्षा 75 टक्के लोकांची बोटे हे ठिसूळ होतात. ही लोक गेली पस्तीस वर्षे नियमितपणे बोटे मोडत आहेत.

त्यामुळे त्यांच्या तपासणीमध्ये सांधेदुखीचा आजार आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आपण जर हाताची बोटं मोडत असाल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. अशा लोकांची हाडं ठिसूळ होतात, असे देखील दिसत आहे. अस्थिबंधन शोषून घेते, यामुळे वायूचे फुगे वाढू लागतात. काही लोक आहेत ज्यांना अशा समस्या येत नाहीत.

त्यामुळे हाताची बोटे मोडणे आधी एकदा आपण विचार करावा.

Team Hou De Viral