नको ‘त्या’ विडिओमुळे चर्चेत आली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून भड कले नेटकरी

नको ‘त्या’ विडिओमुळे चर्चेत आली मलायका अरोरा, व्हिडीओ पाहून भड कले नेटकरी

कधी जिम लूकमुळे, कधी बोल्ड फोटोशूटमुळे तर कधी रिलेशनशिपमुळे चर्चेत राहणारी मलायका अरोरा सध्या नको त्या कारणाने चर्चेत आहे. होय, मलायकाचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय आणि विशेष म्हणजे, या व्हिडीओवरून ती जबरदस्त ट्रोल होतेय.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ एअरपोर्टवरचा आहे. यात मलायकासोबत तिची बहीण अमृता अरोरा सुद्धा दिसतेय. अमृता व मलायका दोघीही नुकत्याच जैसलमेरला गेल्या होत्या. तेथून मुंबईला पोहोचल्यावरचा मुंबई एअरपोर्टवरचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये मलायका ड्रायव्हरची वाट पाहताना आणि त्याच्यासोबत फोनवर बोलताना दिसतेय.

फोनवर बोलताना तिच्या चेह-यावरचा संताप स्पष्ट दिसतोय. ‘आम्ही तिकडे येऊ शकत नाही, तू इकडे ये. इकडे ट्राली घेऊन ये,’ असे ती रागारागात म्हणतेय. मलायका अरोराचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नेटकरी भडकली. मग काय, अनेकांनी तिला फैलावर घेतले.

‘देवी मलायकासाठी वेगळी एन्ट्री बनवायला हवी होती,’ असे एकाने लिहिले. अन्य एका युजरने तर मलायकाचे बॉलिवूडमध्ये काय योगदान आहे? असा खोचक सवाल केला आहे. अर्थात काहींनी मलायकाची बाजू घेतली आहे. ‘कधी कधी बॉलिवूड सेलिब्रिटींची किव येते. त्यांना अजिबात खासगी आयुष्य नाही. कधीतरी त्यांनाही स्पेस मिळायला हवी,’असे एका युजरने लिहिले आहे.

सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय. दोघेही लवकरच लग्न करणार असे मानले जातेय. अर्थात अद्यापही या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. चर्चा खरी मानाल तर अर्जुन कपूरने या लग्नासाठी टाळाटाळ चालवली आहे. अद्याप लग्नाची योग्य वेळ आलेली नाही, असे त्याचे मत आहे.

Team Hou De Viral