बाथरुममधून बाहेर आली पण… पँट घालायला विसरली ही अभिनेत्री, स्वतः केला खुलासा

बाथरुममधून बाहेर आली पण… पँट घालायला विसरली ही अभिनेत्री, स्वतः केला खुलासा

कोरोनाच्या प्रादुर्भावानं लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालीय. मास्क घालण्यापासून वारंवार हात धुण्यापर्यंत लोक सतर्कता बाळगत आहेत. आता अभिनेत्री मलायका अरोरानंही आपल्या सोबतचा एक किस्सा शेअर केलाय. मलायका लिहिते, पहिल्यांदा जेव्हा घरात लोक यायचे तेव्हा त्यांना मी सांगायचे, मी माझ्या कुत्र्याला लस दिलीय.

आता मी त्यांना सांगते घाबरू नका, मलाही लस देण्यात आलेली आहे. कोरोनामुळे आपण सगळेच क्रेझी झालोत. एकदा मी एका रेस्टॉरंटच्या बाथरूममध्ये गेली होती. कोपरानं मी बाथरूमचा दरवाजा उघडला. मी माझ्या पायांनी टॉयलेटची सीट उचलली, त्यानंतर मी टिश्यूच्या मदतीनं पाण्याचा नळ साफ केला आणि हात धुतले.

बाहेर येण्यासाठी मी पुन्हा एकदा कोपरानं दरवाजा उघडला. जेव्हा मी परत टेबलजवळ आले, तेव्हा मला समजलं की पँट्स घालायला विसरले आहे. असा मेसेज लिहित मलायकानं हसतानाचा स्माईली शेअर केलाय. 7 सप्टेंबर 2020 रोजी मलायकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर ती होम क्वारंटाईन झाली होती आणि कोरोनाविरोधातील लढाई ती जिंकली होती. “मला नुकतीच कोरोनाची लागण झाली आहे.

माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षण नाहीत. मी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतलं आहे,” अशी माहिती मलायकाने दिली. “मी लवकरच यातून बरी होईन,” असेही ती म्हणाली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्या दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते. ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.

मलायका अरोराच्या फोटोंमध्ये तिची स्टाईल नेहमीच पाहायला मिळते. मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तिला शेवटी सोनी टीव्हीवर ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये जजच्या भूमिकेत पाहिले गेले होते. गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्यासमवेत तिने या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळली होती. याशिवाय मलायका अरोरा तिच्या योगा व्हिडीओ आणि फोटोंसाठीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे.

आपल्या फिटनेसबाबत नेहमी सतर्क असणारी मलायका अरोरा बर्‍याचदा योगाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. म्हणूनच ती आजही अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.

मलायका अगदी नियमितपणे योग आणि अन्य एक्सरसाईज करते. वर्कआऊट करताना ती आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियातील विविध प्लॅटफॉर्म्सवर टाकत असते. यापूर्वीही मलायकाने एक एस्करसाईजचा एक खास व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसून येत होती.

Team Hou De Viral