‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राची बहिण आहे या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी

‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील इंद्राची बहिण आहे या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नी

सध्या छोट्या पडद्यावर मन उडू उडू झालं ही मालिका प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये आता मनोरंजनात्मक घटना-घडामोडी घडताना गेल्या काही दिवसापासून आपण पाहात आहोत.

या मालिकेमध्ये अनेक अभिनेता व अभिनेत्री यांनी काम केले आहे, असे असले तरी या मालिकेत दीपू आणि इंद्रा यांची जोडी प्रेक्षकांनाही खूप आवडत आहे. या मालिकेत अभिनेता अजिंक्य राऊत याने इंद्रा साकारली आहे, तर दीपू ही भूमिका हृता दुर्गुळे हिने साकारली आहे.

या मालिकेत इंद्राच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री देखील आता लोकप्रिय ठरली आहे. तिची देखील सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. या अभिनेत्रीचे नाव प्राजक्ता परब असे आहे. तिने मालिकेत मुक्ता ही भूमिका साकारली आहे, ती आपले फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते.

प्राजक्ता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते आणि चाहत्यांसोबत संवाद देखील साधत असते. प्राजक्ताप्रमाणे तिचा पती देखील मनोरंजन क्षेत्राशी निगडित आहे. याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. तिने अंकुश मोरडे याच्यासोबत लग्न केलेले आहे.

अंकुश हा एक लेखक दिग्दर्शक आहे. त्याने अनेक मालिकांचे लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. प्राजक्ता ही अनेक मालिका व नाटकांमध्ये दिसलेली आहे. माझ्या मित्राची गर्लफ्रेंड तिची ही web-series चांगलीच चर्चेत आली होती. नुकतेच प्राजक्ताने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत.

त्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे. तसेच तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्राजक्ता सध्या अनेक मालिकांमध्ये काम करत असून लवकरच तिचा चित्रपट देखील येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ती परत आली आहे या मालिकेचे दिग्दर्शन देखील अंकुश यांनी केले आहे.

त्याच प्रमाणे हिंदी मालिकांचे हि दिग्दर्शन त्याने केले आहे. अनेक मालिकांच्या काही भागांचे चित्रीकरण करण्याची जबाबदारी देखील अंकुश वर आली होती. नऊ जानेवारी 2019 रोजी अंकुश आणि मुक्ता म्हणजेच प्राजक्ता यांनी लग्न केले आहे, तर आपण ठिपक्यांची रांगोळी मालिका पाहता का?

या मालिकेत इंद्रा आणि मुक्ता या बहिण भावाची जोडी आपल्याला आवडते का? आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral