बाबो! मानसी नाईकने नवऱ्यासोबत चा ‘तो’ व्हिडीओ केला सोशल मिडीयावर शेअर, विडिओ झालाय व्हायरल

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईकने अलिकडेच प्रियकर प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर मानसी सातत्याने चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या मानसीने लग्नानंतर प्रदीप आणि त्याच्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
यामध्येच आता एक व्हिडीओ शेअर करत तिने सासरच्या मंडळींचं कौतुक केलं आहे.लग्न झाल्यानंतर मानसी प्रदीपसोबत त्याचा गावी हरयाणा येथे गेली आहे. या गावातील अनेक फोटो, व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. यात तिचे शेतातील फोटो सगळ्यात जास्त चर्चेत राहिले. विशेष म्हणजे आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
‘ससुराल हो तो एैसा, दुल्हन वही अच्छी जो पिया मन भाये, ससुराल वही अच्छी जहाँ मायके की याद न आये…’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये ती एका लिंबाच्या झाडाखाली उभी असल्याचं दिसून येत आहे. तसंच बॅकग्राऊंडला ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘निम्बूडा निम्बूडा’ हे गाणं ऐकू येत आहे.
दरम्यान, गेल्या कित्येक दिवसांपासून मानसीच्या रिलेशनशीपविषयी चर्चा रंगत होती. पण नोव्हेंबर महिन्यात मानसीने तिचा प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा झाल्याचे जाहीर केले. प्रदीप खरेरा व्यावसायिक बॉक्सर आहे. १९ जानेवारी २०२१ रोजी मानसी आणि प्रदीपने लग्न केले.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.