ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या मदतीसाठी धावून आले ‘विश्वास नांगरे’ पाटील, आरोपीवर केली कठोर कारवाई…

मराठी चित्रपटसृष्टी आणि पोलीस यांचे नाते हे तसेच जवळचच आहे असे म्हणावे लागेल. कारण अनेकदा मराठी चित्रपट सृष्टी मध्ये जेव्हा केव्हा संकट ओढावले त्यावेळेस पोलीस हे त्यांच्या मदतीला जाऊन जातात. आपण असे अनेकदा पाहिले असेल.
मात्र, पोलीस हे सर्वसामान्यांच्या मदतीला देखील धावून जातात. आता देखील असाच प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या बाबतीतला. विश्वास नागरे पाटील हे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. विश्वास नागरे पाटील यांनी २६/११ च्या हल्ल्यात अतिशय मोलाची कामगिरी बाजावली.
आपण ऐकले असेल की विश्वास नागरे पाटील हे आपल्या फिटनेससाठी देखील खूप ओळखले जातात. फिटनेसचे धडे देखील ते अनेकांना देतात. त्यांची प्रकृती एकदम फिट अशी आहे. विश्वास नागरे पाटील हे व्याख्याते म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. आपल्या अमोघ वाणीतून ते अनेकांना मार्गदर्शन देखील करत असतात. त्यांचा हाच दरारा अनेकांना खूप आवडतो.
तसेच त्यांची बोलण्याची पद्धत देखील सर्वांना खूप आवडते. त्याचप्रमाणे ते जेव्हा केव्हा जॉगिंग करतात, त्यावेळेस त्यांचे व्हिडिओ देखील काही व्हायरल झाल्याचे आपण पाहिलेले आहे. विश्वास नागरे पाटील यांनी मुंबई हल्ल्यात अतिरेक्यांना अगदी जवळून पकडले होते. त्यानंतर त्यांच्या अनेक मुलाखती देखील सोशल मीडियावर आल्या होत्या.
आता देखील विश्वास नागरे पाटील यांच्या बद्दल कौतुकाचे बोल दिले आहेत ते अभिनेत्री मनवा नाईक हिने. मनवा हिच्या बाबतीत नुकताच एक प्रकार मुंबईत घडला होता. याबाबत आपल्याला माहितीच असेल. मनवा ही एका टॅक्सीने एका ठिकाणी जात होती. त्यावेळेस त्या टॅक्सी चालकाने मनवा नाईक सोबत उद्धट वर्तन केले.
मनवा नाईक ही त्या टॅक्सी चालकाला म्हणत होती की, तू फोनवर बोलू नकोस. अपघात होऊ शकतो. मात्र, तो टॅक्सी चालक काही ऐकत नव्हता. त्यानंतर त्या टॅक्सी चालकांनी मनवा हिच्या सोबत उद्धट वर्तन केले. त्यानंतर मनवा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना टॅग करत याबाबत माहिती दिली होती. आणि आपली तक्रार नोंदवली होती.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने मनवा नाईक हिला फोन केला आणि तिच्या समस्येचे निराकरण करून त्या टॅक्सी चालकाला अटक देखील केली. मनवा हिने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबत विश्वास नागरे पाटील यांचे आभार मानले आहेत. मी ज्यावेळेस ट्विट केले, त्यानंतर विश्वास नागरे पाटील यांचे मला उत्तर आले आणि मनवा आम्ही ताबडतोब त्या व्यक्तीवर कारवाई करत आहोत, तुम्ही काळजी करू नका, असे सांगितले.
त्यावर मनवा हिने मुंबई पोलिसांचे आणि विश्वास नागरे पाटील यांचे आभार मानले आहेत. मुंबई पोलीस हे खूपच कर्तव्यदक्ष आहेत, असे म्हटले आहे. तर आपल्याला याबद्दल काय म्हणायचे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा.