‘तारक मेहता…’ मध्ये गरीब दिसणारा तुकाराम आत्माराम भिडे खऱ्या लाईफमध्ये आहे कोट्यावधी रुपयाचा मालक.. त्याची संपत्ती पाहून चकित व्हाल..

कोरोना महामारी मुळे गेल्या अनेक दिवसापासून मालिकांचे चित्रीकरण बंद होते. त्याचप्रमाणे चित्रपटांचे चित्रीकरण सुद्धा बंद होते. याचा फटका हा अनेकांना बसलेला आहे. चित्रपटात काम करणारे कलाकार बॅकस्टेज कलाकार, अभिनेता, अभिनेत्री यांना जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. यासोबतच मालिकांच्या सेटवर काम करणाऱ्यांना देखील याचा फटका बसलेला आहे.
अनेक कलाकारांनी पुढे येऊन या कलाकारांसाठी मदत गोळा केली होती. अभिनेते प्रशांत दामले यांना नुकतीच कोरोना लागण झाली आहे. प्रशांत दामले यांनी सुरुवातीला बॅकस्टेज कलाकारांसाठी मोठी मदत केली होती. त्यानंतर कलाकारांसाठी अनेक जण पुढे आले होते. हळूहळू कोरोना आता कमी होत आहे. त्या अनुषंगाने देशात देखील अनलॉक सुरू आहे आणि हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत आहेत.
मालिकांचे चित्रीकरण देखील सुरू आहे. मराठी मालिका पुन्हा नव्याने आता सुरू होत आहेत. हिंदी मालिका देखील चांगल्या प्रकारे सुरु आहेत. या मालिकांचे चित्रीकरण आता सुरू करण्यात येत आहे. आज आम्ही आपल्याला तारक मेहता का उल्टा चश्मा बद्दल माहिती देणार आहोत.
तारक मेहता का उल्टा चश्मा हा गेल्या काही वर्षांपासून एक ब्रँड झालेला आहे. ही मालिका लहानांपासून मोठ्यांना खूप आवडते. या मालिकेतील सर्व पात्र चांगले आहेत. दयाबेन, जेठालाल, चंपकलाल, पत्रकार अशा भूमिका सर्वांनाच आवडतात. त्यानंतर हा थी ही भूमिका साकारणारा कलाकार देखील सर्वांना खूप आवडतो.
गोकुळधाम सोसायटी ही सर्वत्र चर्चेचा विषय आहे. ही मालिका आजही तेवढीच चालत असते. या मालिकेमध्ये गोकुलधाम सोसायटीचे अध्यक्ष म्हणून आत्माराम तुकाराम भिडे यांनी काम केले आहे. ही भूमिका मराठमोळे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी केलेली आहे. मंदार चांदवडकर हे आधी इंजिनीयर होते. त्यांनी काही वर्ष नोकरी देखील केलेली आहे.
मात्र, अभिनयाची आवड असल्याने त्यांनी मराठी मालिका आणि चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अनेक मराठी आणि चित्रपटात काम केलेले आहे. त्यांच्या भूमिकेला त्यांनी योग्य न्याय देखील दिला आहे. त्यांचा जन्म 27 जुलै 1976 रोजी झालेला आहे. मंदार हे तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत सर्वांना हसवत असतात. या एका भागाच्या चित्रीकरणासाठी ते तब्बल पंचेचाळीस हजार रुपये घेत असल्याचे सांगण्यात येते.
मंदार यांच्याकडे जवळपास वीस कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे देखील सांगण्यात येते. तसेच त्यांच्याकडे आलिशान गाड्या आणि आलिशान बंगला देखील आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करताना आपल्याला अतिशय आनंद मिळत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितले.
तसेच या मालिकेतील सर्वजण आपल्याशी अतिशय आपुलकीने वागत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण काही वर्ष तरी या मालिकेत काम करू, असेही ते म्हणाले.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.