नाना पाटेकरच्या प्रेमात पूर्ती वेडी झाली होती ही अभिनेत्री, नानांसाठी तिने खाणंपिणं सोडलं होत, जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल

अभिनेता नाना पाटेकर यांच्या बद्दल काही बोलायचे म्हणजे शब्द अपुरे पडतात.नाना पाटेकर म्हणजे एक असे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे की, ज्याने आपल्या अभिनयाने मराठी हिंदी चित्रपटसह देशाला मनमोहित केले आहे. नाना पाटेकर यांची ख्याती परदेशात देखील गेली आहे. नाना पाटेकर यांचे चित्रपट हे प्रचंड चाललेले आहेत.
पाटेकर यांचा तिरंगा, क्रांतिवीर यासारखे चित्रपट हे सिल्वर जुबली झाले होते. त्यानंतर त्यांनी कॉमेडीमध्ये देखील आपले नशीब आजमावले आहे. कॉमेडी देखील ते उत्कृष्ट प्रकारे करू शकतात. त्यांनी वेलकम या चित्रपटात अफलातून काम केले होते. त्यांची ही भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. तसेच नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी साकारलेला पुरुष या नाटकातील अभिनय देखील प्रचंड गाजला होता. हे नाटक इतके गाजले होते की, त्यानंतर नाना पाटेकर यांना थेट बॉलिवूडमधून देखील ऑफर मिळाल्या होत्या.
यासोबतच नाना पाटेकर यांनी आपली समाजकार्याची आवड सुद्धा जपलेली आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सोबत नाना पाटेकर यांनी मिळून नाम फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. हे फाउंडेशन गोरगरीब शेतकऱ्यांना मदत करते. या फाऊंडेशनचे ख्याती राज्यभरात सर्वत्र झालेली आहे. त्यामुळे नानांच्या समाजकार्याची दखल देखील अनेकांनी घेतली आहे. असे असले तरी आपल्या फटकळ स्वभावामुळे नाना पाटेकर हा सर्वत्र प्रसिद्ध आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी देखील त्याचे वाजले होते. राज ठाकरे यांनी जाहीर भाषणांमधून नाना पाटेकर याचा समाचार घेतला होता. नाना पाटेकर यांना एक मुलगा आहे. तसेच ते पत्नीपासून सध्या विभक्त राहत असल्याच्या बातम्या देखील चर्चेत असतात.आम्ही आज आपल्याला नाना पाटेकर यांच्या बद्दल एक वेगळी गोष्ट आपल्या सांगणार आहोत.ही बाब अनेकांना माहिती नसेल.
नाना पाटेकर यांनी काही वर्षांपूर्वी अग्निसाक्षी हा चित्रपट केला होता. या चित्रपटाची निर्मिती बिंदुमाधव ठाकरे यांनी केली होती. हा चित्रपट त्याकाळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये मनिषा कोईराला आणि जॉकी श्रॉफ यांची भूमिका होती. या चित्रपटात नाना पाटेकर एक कडक स्वभावाचा माणूस दाखवला होता. त्यामुळे मनिषा कोईराला या चित्रपटांमध्ये नाना पाटेकर यांना कायम दाबून राहत असते.
मनिषा कोईराला हिला चित्रपटांमध्ये नृत्य करण्याचा नाद असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र, नाना पाटेकर यांना हे अजिबात आवडत नसे. नाना पाटेकर च्या आईचा मृत्यू या नृत्यामुळे झाला असा त्यांचा समज होता. त्यामुळे नाना पाटेकर पत्नी मनीषावर चित्रपटात खूप अत्याचार करत असतो.त्यामुळे नाना पाटेकरला ती चित्रपटात वैतागलेली असते.
मात्र, असे चित्रपटात कथानक असले तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये नाना पाटेकरसाठी मनिषा कोईराला ही वेडीपीशी झाली होती. मनिषा कोईराला हिने नाना पाटेकर साठी अन्न पाणी सोडल्याची देखील त्या वेळी चर्चा होती. मात्र, या दोघांच्या प्रेमाची माहिती नाना पाटेकर यांच्या पत्नीला लागली होती. त्यानंतर हे प्रकरण संपुष्टात आल्याचे सांगण्यात येते.
मात्र, नाना आणि मनिषा कोईराला यांचे नाव आजही खूप चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी मनिषा कोईराला हिने नेपाळी उद्योगपती सोबत लग्न केले होते. मात्र, तिचा हा विवाहदेखील टिकू शकला नाही. दोघांनी घटस्फोट घेतला होता. काही वर्षांपूर्वी मनिषा कोईराला हिला कॅन्सरने ग्रासले होते. यावरही तिने यशस्वीपणे मात केली. आता चित्रपटाच्या काही ऑफर मिळतात का याकडे ती लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येते.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.