अबब ! ‘बिगबॉस मराठी 3’ च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात ‘चिक्कार’ मानधन

अबब ! ‘बिगबॉस मराठी 3’ च्या एका एपिसोडसाठी महेश मांजरेकर घेतात ‘चिक्कार’ मानधन

कलर्स मराठी वर मराठी बिग बॉस सुरू होऊन आता जवळपास एक महिन्याचा कालावधी होत आहे. या शोमध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले आहेत. त्यामध्ये भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, विकास पाटील, विशाल निकम, सुरेखा कुडची, सोनाली पाटील, जय दुधाने, स्नेहा वाघ, अविष्कार दारव्हेकर, दादुस आणि इतर कलाकार देखील सहभागी झाले होते.

मात्र, यातील शिवलीला बाळासाहेब पाटील हिने आपणहून हा शो सोडला आहे, तर अक्षय वाघमारे हा घराच्या बाहेर पडला आहे, तर मराठी बिग बॉस आता रंजकतेच्या बाबतीत सध्या गाजत आहे. सध्या मराठी बिग बॉसचा टीआरपी देखील अधिक मिळत आहेत. याचा प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत असताना दिसत आहे.

महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करत असतात. दर आठवड्याला चावडीवर कलाकारांना एकत्र घेऊन ते सल्ले देत असतात. तसेच त्यांच्या काही चुका झाल्या. याबाबतही ते माहिती देत असतात. हा शो सुरू होण्याआधी महेश मांजरेकर यांनी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत. त्यांना कर्करोगासारख्या आजाराने ग्रासले होते.

मात्र, यातून ही ते यशस्वीरीत्या बाहेर पडले आहेत. हा शो सुरू होण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि बिग बॉस प्रोमो शूट करताना आपल्याला कशा पद्धतीने त्रास झाला, याबाबतही त्यांनी माहिती दिली होती. महेश मांजरेकर तेव्हा म्हणाले होती की, पायामध्ये माझ्या नळ्या घालण्यात आल्या होत्या.

वेदना मी सहन करत होतो, तरीदेखील चित्रीकरणाचे महत्त्व काय असते, हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे हा प्रोमो मी आधी शूट केला. त्यानंतर हा शो सुरु झाला. हिंदी बिग बॉस धर्तीवरच मराठी बिग बॉस सुरू करण्यात आला आहे. हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन अभिनेता सलमान खान हा करत असतो.

सध्या हिंदी बिग बॉसचे पंधरावे सत्र प्रसारीत होत आहे. सलमान खान हा दिग्गज अभिनेता आहे, असे असले तरी तो बिग बॉस सूत्रसंचालन करत असतो. या बिग बॉससाठी सलमान खान याला कोट्यवधी रुपये मानधन देण्यात येते. हिंदी बिग बॉसचा चाहतावर्ग देखील खूप आहे. त्यामुळेच हिंदी बिग बॉसने आजवर पंधरा भाग पूर्ण केले आहेत.

आजवर मराठी बिग बॉसमध्ये देखील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये रेशम टिपणीस हीदेखील सहभागी झाली होती. त्याचप्रमाणे उषा नाडकर्णी या देखील पहिल्या भागामध्ये सहभागी झाल्या होत्या. महेश मांजरेकर यांनी अजून अनेक मालिका चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट हिट देखील झालेले आहेत.

ते सध्या मराठी बिग बॉसमध्ये सूत्रसंचालन करताना दिसताहेत. मराठी बिग बॉससाठी त्यांना जवळपास एका भागासाठी 25 लाख रुपये मानधन दिले जाते. त्यांचे हे मानधन हिंदी बिग बॉस पेक्षा कमीच असल्याचे सांगण्यात येते. मात्र, असे असले तरी सोशल मीडियावर अनेकांनी महेश मांजरेकर यांच्यावर टीका देखील केली आहे.

तसेच त्यांचे समर्थन देखील केले आहे. एका भागासाठी एवढे पैसे कसे काय मिळतात, असे काय ते काम करतात, असे देखील अनेकांनी म्हटले आहे. मात्र, कलाकारांचे नाव जेवढ मोठ असतं तेवढेच त्यांना मानधन मिळते, हे देखील सत्य आहे. त्यामुळे महेश मांजरेकर यांना मिळणारे मानधन योग्यच असल्याचे अनेकांनी सांगितले आहे.

Team Hou De Viral