लग्नानंतर जरा जास्त वाया गेलीस असे म्हणत ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लोकांनी घातल्या शिव्या…

लग्नानंतर जरा जास्त वाया गेलीस असे म्हणत ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला लोकांनी घातल्या शिव्या…

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत की, त्यांनी महाराष्ट्रीयन तरुणांसोबत लग्न न करता इतर राज्यातील तरुण आणि परदेशी तरुणासोबत देखील लग्न केल्याचे पाहायला मिळते. राधिका आपटे ही मराठमोळी मुलगी असली तरी तिने परदेशातील एका व्यक्तीसोबत लग्न केले आहे.

त्याचप्रमाणे अमृता खानविलकर हिचा पती देखील हिंदी भाषिक आहे. तिच्या पतीचे नाव हर्ष मल्होत्रा असे आहे, तर आम्ही आज आपल्याला मानसी नाईक हिच्या बद्दल माहिती देणार आहोत. मानसी नाईक हिने देखील एका हिंदी भाषिक व्यक्ती सोबतच लग्न केले आहे.

मानसी नाईक हिने अनेकांना आजवर घायाळ केले आहे. मानसी नाईक हिने आजवर अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. तिने अनेक चित्रपटात हिट अशी गाणी देखील दिलेली आहेत. मात्र, तिचा ‘वाट पाहतोय रिक्षावाला’ हे गीत प्रचंड गाजले होते. या चित्रपटांमध्ये तिच्यासोबत मकरंद अनासपुरे हा दिसला होता.

यानंतरही तिला अनेक अल्बम मध्ये काम मिळाले होते. मानसी नाईक ही मराठीतील छान अशी अभिनेत्री आहे. गेल्या काही वर्षापासून ती नाटक आणि चित्रपटात काम करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमितपणे संवाद साधत असते. यामुळे चाहते देखील तिला लाईक आणि कमेंट करत असतात.

आगामी काळामध्ये आपल्याकडे काही चित्रपटांच्या ऑफर असल्याचे देखील तिने सांगितले आहे. मानसी नाईक हिने 19 जानेवारी 21 रोजी लग्न केले. मानसीच्या पतीचे नाव प्रदीप खरेरा आहे. प्रदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे आणि तो हरियाणातील रहिवासी आहे. तो खूप श्रीमंत असल्याचे देखील सांगण्यात येते.

हरियाणामध्ये त्यांच्याकडे भरपूर शेती आहे. मानसी नाईक ही लग्न झाल्यानंतर हरियाणामध्ये आपल्या सासरवाडीमध्ये गेली होती. या वेळी तिने शेतातील आपले काही फोटो शेअर केले होते. आपल्या दिरासोबत देखील तिने खेळ खेळला होता. मानसी हिचे नाईकचे हरियाणामध्ये देखील पारंपारिक पद्धतीने लग्न झाले आहे.

मानसी नाईक हिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटो वरूनच आता तिच्यावर चाहत्यांनी टीका केली आहे. या फोटोमध्ये ती एका बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ड्रेस अतिशय बोल्ड असा आहे. ग्रे कलरचा असलेला हा ड्रेस तिला उठून दिसत आहे. मात्र, यामधून तिचे रूप हे अतिशय बोल्ड असे दिसत आहे.

यावरून चहात्यांनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. अनेकांनी अशी टीका केली आहे की, तू महाराष्ट्रची मुलगी आहेस. त्यामुळे तू असे ड्रेस घालणं बंद कर, आता तुझे लग्न झाले आहे. लग्नानंतर तू वाया गेलीस असे देखील अनेक चाहत्यांनी म्हटले आहे. त्यावर मानसी नाईक हिने काही उत्तर दिले नाही.

Team Hou De Viral