मूठभर मनुके खा, निरोगी रहा; दररोज खाण्याचे हे आहेत 6 फायदे

मनुका किंवा किशमिश हे फक्त खीर, शिरा, पुलावामध्ये स्वाद वाढवण्यापूरती मर्यादीत नसून त्याचे अनेक औषधी फायदेही आहेत. मनुका खाण्याने कोणते फायदे शरीराला होतात जाणून घेऊया. मनुकांचे दोन प्रकार आहेत. मनुका ज्याला बेदाणे किंवा किशमिश म्हणतात आणि दुसऱ्या काळ्या मनुका.
रोज मनुका खाल्ल्यानं शरीरातील रक्ताभिसरण चांगलं होतं. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या व्यक्तिंनी मनुकांचं सेवन करावं. मनुकांमध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात आणि जॉईंटपेनचा त्रास होत नाही.
मूठभर मनुका खाऊन त्यावर पाणी प्यायल्यानं शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम मनुका करतं.अशक्तपणा, अॅनिमियासारख्या आजारांवर मनुका गुणकारी आहेत.वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात मूठभर मनुक्यांचा समावेश करावा. मनुकांमुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
काळ्या मनुकांमध्ये लोह आणि पोटॅशियमचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे हिमोग्लोबीन, नियमित येणारा थकवा यांसारख्या समस्या भेडसावत नाहीत. काळ्या मनुका भिजवून खाल्ल्या तर त्या शरीरासाठी लाभदायी आहेत. मात्र नुसत्याच खाल्ल्यास शरीरातील उष्णता वाढते.
अर्धशिशीचा त्रास असलेल्यांनी रोज काळे मनुके आणि धणे रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी हे पाणी प्यावं अर्धशिशीचा त्रास कमी होतो.काळ्या मनुका रोज रात्री पाण्यात भिजत घालून खाल्ल्यानं पोट साफ होते. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
काळे मनुके खाल्ल्यानं आम्लपित्त, अपचन, ढेकर येणं अशा प्रकारच्या समस्यांपासून सुटका मिळते. मूतखडा, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि जळजळ यावर गुणकारी आहे.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.