या मराठमोळ्या अभिनेत्रींचा अभिनयाव्यतिरिक्त आहे स्वतःचा वेगळा व्यवसाय, कमावतात लाखों रुपये, ६ नंबरची अभिनेत्री तर कमावते लाखोंमध्ये पैसे…

या मराठमोळ्या अभिनेत्रींचा अभिनयाव्यतिरिक्त आहे स्वतःचा वेगळा व्यवसाय, कमावतात लाखों रुपये, ६ नंबरची अभिनेत्री तर कमावते लाखोंमध्ये पैसे…

आजकालच्या जमान्यामध्ये केवळ नोकरी करून किंवा एकाच क्षेत्रात काम करून भागत नाही तर अतिरिक्त पैसा कमवण्यासाठी इतर व्यवसायाची जोड सुद्धा त्याला द्यावी लागते. असे केले तरच आपण लाखो रुपये कमावून सुखी आयुष्य जगू शकतो. मात्र, यालादेखील काही मर्यादा असतात. असे करणे हे सर्वांनाच जमत नाही. मात्र, जोडधंदा करणे हे काही जणांना शक्य असते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत की, अभिनयासोबत आपले इतर व्यवसाय देखील सांभाळत असतात. बऱ्याच अभिनेता आणि अभिनेत्री यांचा कपडे आणि डिझायनिंगचा व्यवसाय असतात.

तसेच काही अभिनेत्यांचा हॉटेल व्यवसाय देखील आहे, तर काही अभिनेते हे रियल इस्टेट मध्ये देखील पैसा कमावतात, तर काही शेतीमध्ये देखील पैसा गुंतवत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये मराठी चित्रपटातील अशा काही अभिनेत्री बाबत माहिती देणार आहोत की, त्यांनी अभिनयासोबतच आपला स्वतःचा व्यवसाय करून लाखो रुपये कमवत आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत त्या अभिनेत्री..

1) निवेदिता सराफ : निवेदिता सराफ यांचे सुरुवातीचे नाव निवेदिता जोशी असे होते. मात्र, त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्या निवेदिता सराफ झाल्या त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाची चुणूक सर्वांनी पाहिली आहे. सध्या त्या टीव्ही मालिकामध्ये देखील दिसत आहेत. अभिनयासोबतच त्या व्यवसाय देखील करत आहेत. त्यांचा स्वतःचा साड्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या ब्रँडचे नाव दामिनी कलेक्शन असे आहे. या ब्रँडचे त्यांनी अनेक प्रदर्शन देखील लावलेले आहेत. ना नफा ना तोटा तत्त्वावर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. आज मात्र त्या लाखो रुपये कमवत आहेत.

2) तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे : तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. तेजस्विनी पंडित हिने काही महिन्यापूर्वी आलेली समांतर या वेब सिरीज मध्ये स्वप्निल जोशी सोबत तिने चुंबन दृष्य देऊन सगळ्यांनाच घायाळ केले होते. तेजस्विनी आणि आभिज्ञा यांच्या ब्रँडचे नाव तेजज्ञा असे आहे. या ब्रँड अंतर्गत त्या कपड्यांचा व्यवसाय करतात. या ब्रँडने नुकतीच मास्क देखील मोठ्या प्रमाणात बनवले होते. त्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती.

3) क्रांती रेडकर : क्रांती रेडकर हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. मात्र, असे असले तरी कोंबडी पळाली या गाण्यासाठी तिला ओळखले जाते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. क्रांती रेडकर हिने इतर चित्रपटात देखील खूप काम केले आहे. कांती रेडकर हिने zz हा कपड्याचा ब्रँड विकसित केला आहे. या ब्रँडचे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो अपलोड करत असते. तिला या व्यवसायात चांगलाच फायदा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

4) प्रिया बापट : प्रिया बापट मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात छोटीशी भूमिका करून सर्वांना चकीत केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. प्रिया बापट नाटक, चित्रपट, संगीत सगळ्या क्षेत्रात नावाजलेले नाव आहे. बहिण श्वेता बापट सोबत ती साड्यांचा व्यवसाय करते. त्यांच्या ब्रॅण्डचे नाव सावंगी असे आहे. या माध्यमातून त्या लाखो रुपये कमवत आहेत. श्वेता बापट ही सेलिब्रिटी डिझायनर असल्याचे सांगण्यात येते.

5) अपूर्वा नेमळेकर : अपूर्वा नेमळेकर टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये गाजलेले असे नाव आहे तिने आजवर भरपूर चित्रपटात आणि मालिकात काम केलेले आहे. अपूर्व हिचा स्वतःचा व्यवसाय असून त्या व्यवसायाचे नाव अपूर्व कलेक्शन असे आहे. या माध्यमातून ती दागिने बनवते आणि स्वतः दागिन्यांचे डिझाईन देखील करते. तीदेखील गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सांभाळत आहे.

6) सई लोकूर : बिग बॉसच्या माध्यमातून सई हिने चांगली ओळख मिळालेली आहे. तसेच तिने काही मालिकादेखील काम केले आहे. सई ही देखील व्यवसाय आहे, ती दागिने बनवते. तिच्या ब्रँडचे नाव सई असे आहे. तिच्या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ती दागिने बनवण्यासाठी लाकडाचा देखील मोठ्या खुबीने वापर करते. या व्यवसायाच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमावते.

7) सई ताम्हणकर : सई ताम्हणकर हिने अनेक चित्रपटात काम करून सर्वांना घायाळ केले आहे. सई ताम्हणकर अभिनयापेक्षा हॉट दृश्याने जास्त चर्चेत आलेली आहे. दुनियादारी चित्रपटातील तिने काम केलेली भूमिका सगळ्यांनाच खूप आवडली होती. काही वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. मात्र, काही कारणांनी तिचा घटस्फोट झाला आहे. असे असले तरी अभिनयासोबत ती खासगी व्यवसाय करत आहे. तिने तिची मैत्रीण श्रुती भोसले हिच्यासोबत द सारी स्टोरी या ब्रँड ची तिने घोषणा केली आहे. याच्या माध्यमातून ती साड्या वितरीत करणार आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral