जिला समजत होते छोटी-मोठी अभिनेत्री, ती निघाली निळू फुले यांची मुलगी, झी मराठी वरील या प्रसिद्ध मालिकेमध्ये केलंय काम..

जिला समजत होते छोटी-मोठी अभिनेत्री, ती निघाली निळू फुले यांची मुलगी, झी मराठी वरील या प्रसिद्ध मालिकेमध्ये केलंय काम..

निळू फुले भारतीय चित्रपट सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणावे लागेल. निळू फुले यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकीर्दीत अनेक सर्वोत्कृष्ट भूमिका साकारून आपल्या करिअरमध्ये चार चाँद लावले होते. निळू फुले म्हटले की ग्रामीण बाजाचा खलनायक अनेकांच्या समोर येतो.

जुन्या काळात अनेक बायका निळू फुले हे टीव्हीवर दिसताच अनेक बायका त्यांच्या नावाने कडाकडा बोटं मोडत. यातच त्यांचे यश होते. याबाबत त्यांना अनेकदा विचारणा देखील करण्यात आली होती. यावर त्यांनी खूप छान उत्तर दिले होते. माझा अभिनय लोकांना आवडतो त्यामुळेच लोक माझ्यावर चिडत असतात, असे त्यांनी सांगितले होते. अनेक महिला या मला शिव्या घालतात. त्यामुळे त्याचे मला काहीच वाटत नाही. ते माझ्या अभिनयाला आणि चित्रपटातील भूमिकेला शिव्या घालत असतात.

मात्र, यातच माझे यश असल्याचे त्यांनी म्हटले होते. असे असले तरी निळू फुले एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून देखील खूप प्रसिद्ध होते. निळू फुले यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक संस्थांना मदत केली आणि अनेक लोकांना आयुष्यामध्ये उभे केले होते. त्यांचे समाजकार्य फार मोठे होते.

अतिशय थोर असणाऱ्या या अभिनेत्याने कथा अकलेच्या कांद्याची या नाटकातून चित्रपट सृष्टी मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर त्यांनी पिंजरा हा दर्जेदार चित्रपट केला होता. यातील भूमिका त्यांची खूप गाजलेली होती. सिंहासन यासारखा चित्रपट देखील त्यांनी केला होता. याशिवाय त्यांचा अनेक मराठी चित्रपटांतून अभिनय गाजला होता.

सर्वजण त्यांना मराठी चित्रपट सृष्टी मध्ये आदराने हाक मारायचे.निळू फुले यांचा बाई वाड्यावर या हा डायलॉग प्रचंड गाजला होता या गाण्यावरून मानसी नाईक हिने अल्बमही तयार केला होता. अशा या थोर अभिनेत्याने 2009 मध्ये या जगाचा निरोप घेतला. त्यावेळेस अवघी चित्रपट सृष्टी हळहळली होती. निळू फुले यांनी हिंदी चित्रपटात देखील खूप भूमिका केल्या होत्या.

मिथुन चक्रवर्ती माधुरी दीक्षित सोबत त्यांचा प्रेम प्रतिज्ञा हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांना हिंदीमध्ये अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. निळू फुले यांना एक मुलगी आहे तिचे नाव गार्गी फुले असे आहे. गार्गी फुले देखील सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपले नशीब आजमावत आहे.

गार्गी फुले यांचे लग्न 2007 मध्ये ओंकार थत्ते यांच्याशी झाल आहे. त्यांना अनय हा मुलगा आहे आणि पुण्यात हे कुटुंब वास्तव्यास आहे. गार्गी फुले यांनी तुला पाहते रे या मालिकेत ईशा च्या आईची भूमिका साकारलेली आहे. या मालिकेने त्यांना चांगली ओळख करून दिली. या आधी देखील त्यांनी कट्टी बट्टी या मालिकेत काम केले होते. मात्र, ही मालिका काही जास्त चालली नाही. आता त्यांच्याकडे काही मालिकांचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral