मराठी अभिनेते ‘जितेंद्र जोशी’ बायकोला पाहिलंत का ?, एखाद्या अभिनेत्रीला ही लाजवेल एवढ्या सुंदर आहेत त्या…

मराठी अभिनेते ‘जितेंद्र जोशी’ बायकोला पाहिलंत का ?, एखाद्या अभिनेत्रीला ही लाजवेल एवढ्या सुंदर आहेत त्या…

जितेंद्र जोशी हा मराठीचा हरहुन्नरी कलाकार. जितेंद्र जोशी हा असा एक अभिनेता आहे की, ज्याने आजवर सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यात. जितेंद्र जोशी याने विनोदी, चरित्र, खलनायक या सगळ्यात भूमिकांना स्पर्श करून चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

काही वर्षापूर्वी आलेल्या सिंघम रिटर्न्स या चित्रपटात देखील त्याने छोटी भूमिका केली होती. मात्र, त्याची भूमिका छोटी असली तरी प्रेक्षकांना ती खूप आवडली होती. जितेंद्र जोशी याने काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर घडलय बिघडलय नावाचा कॉमेडी शो केला होता. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी याचे दिग्दर्शन केले होते.

यामध्ये जितेंद्र जोशी याने कृष्णाची भूमिका केली होती. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भूमिका देखील या शोमध्ये दिसत होत्या. या शोने प्रचंड यश त्यावेळेस मिळत होते. त्यानंतर जितेंद्र जोशी याने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक नाटक मालिका चित्रपट यामध्ये त्याने आपल्या चतुरस्त्र अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

काही वर्षांपूर्वी आलेला “दुनियादारी” हा चित्रपट आपल्याला आठवत असेल. दुनियादारी ही कादंबरी काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजली होती. सुहास शिरवळकर यांनी ही कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित “दुनियादारी” हा चित्रपट आला होता. दुनियादारी या चित्रपटामध्ये जितेंद्र जोशी याने साई नावाचे पात्र साकारले होते. त्याचे हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते.

त्याची बोलण्याची स्टाइल प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या चित्रपटांमध्ये अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर यांच्या देखील भूमिका होत्या. या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले. त्यानंतर जितेंद्र जोशी अनेक चित्रपट आणि मालिकामध्ये दिसला. मात्र, खऱ्या अर्थाने त्याला आणखी यशोशिखरावर नेऊन ठेवले ते संत तुकाराम या चित्रपटाने.

संत तुकाराम हा चित्रपट देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता जितेंद्र जोशी याच्या बाबतीतली एक बातमी नुकतीच सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही बातमी म्हणजे जितेंद्र जोशी याच्या पत्नी बाबतची आहे. जितेंद्र जोशी याची पत्नी ही देखील चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे.

चित्रपट क्षेत्राशी संबंधित काम करते. जितेंद्र जोशी याने 2009 मध्ये लग्न केले आहे. जितेंद्र जोशी याच्या पत्नीचे नाव मिताली जोशी आहे. मिताली जोशी या जितेंद्र याच्यासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंना चाहते देखील लाईक करत असतात.

जितेंद्र जोशी आणि मिताली या दोघांना एक मुलगी असून ही मुलगी देखील खूपच गोड आहे, तर जितेंद्र जोशी आपल्याला आवडतात का आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral