दिवाळीचा ‘फराळ’ विकून या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा झाला ‘कोट्याधीश’

दिवाळीचा ‘फराळ’ विकून या लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचा नवरा झाला ‘कोट्याधीश’

दिवाळीचा सण म्हटला की, सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा वर्षभरातील महत्त्वाचा सण. कितीही अडचणी आल्या तरी अनेक जण हा सण साजरा करत असतात. गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांचा घरचा उत्साह असतो.

घरी दिवे लावणे, गोडधोड खाणे, चांगले कपडे घेणे आणि आनंदात सगळ्यांच्या भेटी घेणे, असे या सणाचे महत्व आहे. या सणाची वाट लहान मुले आवर्जून पाहत असतात. असे मोठ्यानाही या सणाचे खूप अप्रूप असते. घरी फराळ देखील मोठ्या प्रमाणात होत असतात.दिवाळी ही साधारणपणे वसुबारस या सणापासून सुरू होते.

त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हा असा मोठा सण आहे. या दिवसात एकमेकांना भेटून शुभेच्छा देत असतात. श्री भगवान विष्णूने आजच्या दिवशी लक्ष्मी मातेसह अनेक स्त्रियांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले होते. त्यामुळे लक्ष्मीपूजन हे साजरे करतात, अशी आख्यायिका आहे.

मराठी चित्रपटसृष्टी मध्ये देखील अनेक असे कलाकार आहेत की जे मालिका, चित्रपट हे विश्व सांभाळून इतर व्यवसाय देखील करत असतात. अनेक कलाकारांचे मोठे मोठे व्यवसाय आहेत. या व्यवसायाच्या जोरावरच हे कलाकार आपला व्याप वाढवताना दिसतात. आज आम्ही आपल्याला एक अशाच अभिनेत्री बद्दल माहिती सांगणार आहोत.

या अभिनेत्रीचे पती देखील एका मोठ्या व्यवसायात कार्यरत आहेत. या अभिनेत्रीचे नाव किशोरी गोडबोले असे आहे. किशोर गोडबोले यांनी मालिका चित्रपटात काम केले आहे. तिने काम केलेले अनेक चित्रपट मालिका खूप गाजलेले आहेत. किशोर गोडबोले हिने खबरदार या चित्रपटातही काम केले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

यासोबतच काही मालिकामध्ये देखील तिने काम केले होते. किशोरी हिच्या पतीचे नाव सचिन गोडबोले असे आहे. सचिन हे जपानमध्ये एका मोठ्या कंपनीत नोकरीला होते. मात्र, सचिन गोडबोले यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर ते भारतात परत आले. सचिन गोडबोले यांच्या आईने फराळाचे दुकान आधीपासून सुरू केले होते.

सुरुवातीच्या काळामध्ये केवळ पाच पदार्थ विकून त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती. नंतर सचिन यांनी हा व्यवसाय ताब्यात घेतला आणि व्यापार खूप मोठ्या प्रमाणात वाढवला. आज सचिन गोडबोले यांच्या दुकानातून अनेक देशांमध्ये दिवाळीसाठी फराळ पाठवण्यात येतो. त्यासोबतच ड्रायफूट पदार्थ देखील पाठवण्यात येतात.

माधुरी दीक्षित नेने ही ज्यावेळेस अमेरिकेत राहत होती, त्यावेळेस सचिन यांच्या दुकानातूनच तिच्याकडे फराळ जायचा. तर अशाप्रकारे किशोरी गोडबोले हिचा पती व्यवसायात कार्यरत आहे.

Team Hou De Viral